Fear Grips Melghat: Panic After Man-Eating Tigress, Responsible for 4 Deaths, Brought to Paratwada Transit Centre!

मेळघाटात भीतीचे सावट! चार महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण परतवाड्यात; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!

Fear Grips Melghat: Panic After Man-Eating Tigress, Responsible for 4 Deaths, Brought to Paratwada Transit Centre!परतवाडा (अमरावती) : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात चार महिलांचा जीव घेणाऱ्या एका नरभक्षक वाघिणीला पकडल्यानंतर तिला परतवाडा येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. ही वाघीण मेळघाटच्या जंगलात सोडली जाणार असल्याची चर्चा पसरताच मेळघाट परिसरातील गावकऱ्यांमध्ये आणि आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय? चंद्रपूरमध्ये चार जणांचे बळी घेतल्यानंतर या वाघिणीला पकडण्यात आले होते. तिला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये नेले जाईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता अत्यंत गोपनीय पद्धतीने या वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आणले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमरावती शहरात दहशत माजवणाऱ्या एका बिबट्यालाही याच कार्यालयात आणून ठेवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी बिबट्या आणि नरभक्षक वाघीण असल्याने भीती अधिक वाढली आहे.

स्थानिकांचा विरोध मेळघाटात आधीच वाघांची संख्या मोठी आहे. त्यात आता ही नरभक्षक वाघीण सोडल्यास धोका वाढेल, अशी भावना नागरिकांची आहे. आमदार केवलराम काळे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शविला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि स्थानिकांमध्ये भीती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, वन विभागाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *