
Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल ठोकर या दोघांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यात आसिफ शेखचा सहभाग असल्याचा संशय होता. मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे. ही घटना त्रालमध्ये घडली. याचे काही फोटोही समोर आले आहेत. संशयित दहशतवाद्याचे घर कसे पाडण्यात आले आहे याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत.
दहशतवादी नेटवर्कविरुद्ध सुरक्षा दलांकडून कारवाई सुरूच आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांचे घर उद्धवस्त करण्यात आले आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. सुरक्षा दलांना आदिलच्या घरात एक संशयास्पद पेटी सापडली होती.
|
INS Surat : पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणीची तयारी, त्याआधीच भारताने आएनएस सूरत समुद्रात उतरवले |
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये आसिफ आणि आदिल हे दोघेही दिसत होते. या भ्याड हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. ज्यात आसिफ आणि आदिल यांचा समावेश आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. त्राल परिसरातील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर उडवून देण्यात आले आहे. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी आदिलचे रेखाचित्र औपचारिकपणे जारी केले होते. आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेल्याचे सांगितले जात आहे. त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काश्मीरला परतला. पहलगाममधील हल्ला करण्यासाठी त्याने परदेशी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. यामुळेच दहशतवाद्यांना बैसरन खोऱ्यात आणले गेले.
आसिफ शेख हा दक्षिण काश्मीरचा रहिवासी आहे. त्याचे घरही उडवून देण्यात आले आहे. आसिफ शेखच्या घराची झडती घेत असताना सुरक्षा दलांना एक संशयास्पद बॉक्स सापडला. प्रशासनाने अद्याप या कारवाईबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. पण या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये दोन्ही दहशतवाद्यांच्या घरांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. फरार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल सतत मोहीम राबवत आहेत. लोकांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात आहे. बैसरण व्हॅली आणि पहलगाम व्यतिरिक्त खोऱ्यातील इतर भागातही दहशतवादविरोधी कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी पहाटे बांदीपोरा भागात चकमक झाली जी अजूनही सुरूच आहे.
शहर
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- बीड: परळीत मोकाट कुत्र्यांचा थरार! अवघ्या ४८ तासांत २३ जणांना लचके तोडले, नागरिकांत दहशत!
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
























Subscribe to my channel




