Pantry Staff Threaten Passenger for Asking Bill on Lichchvi Express; Viral Video Sparks Outrage!

ट्रेनमध्ये प्रवाशाची दादागिरी! बिल मागितल्यावरून लिच्छवी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कर्मचाऱ्यांची प्रवाशाला धमकी; व्हिडिओ व्हायरल!

Pantry Staff Threaten Passenger for Asking Bill on Lichchvi Express; Viral Video Sparks Outrage!
भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांची लूट आणि कर्मचाऱ्यांची दादागिरी थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच लिच्छवी एक्सप्रेसचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पॅन्ट्री कारचे कर्मचारी एका प्रवाशाला बिल मागितल्यामुळे धमकावताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशाने जेवणाचे बिल मागितले असता पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी त्याला सन्मानाने वागणूक देण्याऐवजी थेट धमकी देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

यापूर्वीही हेमकुंड एक्सप्रेस आणि सोमनाथ एक्सप्रेसमध्ये अशाच प्रकारे तक्रार करणाऱ्या प्रवाशांना पॅन्ट्री कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा अशा घटनांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी, या प्रकारांची मालिका थांबलेली नाही. सध्या या घटनेबाबत आरपीएफकडे (RPF) तक्रार दाखल करण्यात आली असून, रेल्वे प्रशासन या प्रकरणाची दखल घेत असल्याची माहिती समोर आली आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *