पुणे: औंध-रावेत बीआरटीएस (BRTS) मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील रक्षक चौकातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्ण झाले असून, तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या वाहनचालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, महापालिका प्रशासनाने कोणत्याही औपचारिक उद्घाटनाच्या तारखेची किंवा व्हीआयपी नेत्यांच्या वेळेची प्रतीक्षा न करता, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी रात्रीच हा उड्डाणपूल अचानक वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, हा पूल सुरू होताच अवघ्या २४ तासांच्या आत यावर दोन मोठे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.किरकोळ आणि तांत्रिक कामे शिल्लक असतानाच घाईघाईत पूल सुरू केल्यामुळे नागरिकांमधून आता तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पहिल्या २४ तासांतच एका कारचा भीषण अपघात होऊन ती थेट रस्त्यावर उलटली, तर दुसऱ्या एका घटनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये जोरदार धडक झाली. सुदैवाने या दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा उतार अत्यंत तीव्र आणि धोकादायक असल्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
किरकोळ आणि सुरक्षेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे अपघात घडल्याचा आरोप केला जात असून, भविष्यात पुण्यातील नवले पुलासारखी मोठी दुर्घटना येथे घडू नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका झाली असली तरी सुरक्षेच्या त्रुटींमुळे आता या पुलाची संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शहर
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
- सांगली: मार्केट यार्डातून सेस हटवण्यासाठी ४ ऑगस्टला व्यापाऱ्यांचा एल्गार; दुहेरी कर आकारणीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक
महाराष्ट्र
- पुणे: मावळात मोठा अनर्थ टळला; काळे येथे रस्ता खचल्याने कार थेट शेतात उलटली, धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
- छत्रपती संभाजीनगर: फोन पे वर ५ हजारांची लाच घेतली अन् बेड्या पडल्या; मटण दुकानाच्या परवान्यासाठी लाच घेणारा कंत्राटी डाटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
- बनावट 'योनो' ॲपची लाट! स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या खात्यातून सलग तीन व्यवहारांत उडवले १.८९ लाख रुपये; सायबर चोरांचा नवा डाव उघड
- सांगली: मार्केट यार्डातून सेस हटवण्यासाठी ४ ऑगस्टला व्यापाऱ्यांचा एल्गार; दुहेरी कर आकारणीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक
गुन्हा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
- कोल्हापुरात खळबळ! गळ्याभोवती नायलॉनची दोरी अन् डोके-चेहऱ्यावर गंभीर घाव; गिरगाव पाळकोबा डोंगरात रिक्षाचालकाचा निर्घृण खून
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! अद्ययावत 'कवच ५.०' प्रणालीमुळे आता दर दोन मिनिटांनी धावणार लोकल; प्रवाशांची गर्दी आणि अपघातांची चिंता मिटणार"
- मुंबई: सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, बेकायदेशीर 'म्युल' खात्याद्वारे २१ लाखांहून अधिकची उलाढाल; खातेदारासह इतरांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत
- जंतर-मंतरवरील NEET आंदोलन: "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" अकोल्याचे ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांच्या पाठीशी, व्हिडिओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: सोनम अन् मुस्कानपेक्षाही क्रूर निघाली अर्चना; पहिल्या पतीची मदत घेऊन लग्नाच्या अवघ्या ४५ दिवसांतच संपवला दुसऱ्या नवऱ्याचा घात
- दिल्लीत ठाकरे ब्रदर्सची एन्ट्री! अभिजित दिपके यांच्या 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा थेट पाठिंबा; सरकारवर जोरदार हल्लाबोल"
























Subscribe to my channel




