मुंबई / नंदुरबार / परभणी: अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आधीच संकटात सापडलेला महाराष्ट्रातील बळीराजा आता नवीनच उभ्या राहिलेल्या इंधन टंचाईच्या (Fuel Shortage) संकटामुळे पुरता रडकुंडीला आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे वेगात सुरू असताना, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
या इंधन टंचाईचा पुढचा अध्याय आता थेट हिंसक वळणावर येऊन ठेपला असून, डिझेल भरण्याच्या कारणावरून नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर हाणामारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत.नंदुरबारच्या शहाद्यात शेतकऱ्याला मारहाणखरीप हंगामातील मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी डिझेल मिळवण्यासाठी तासनतास पंपांवर रांगा लावून उभे आहेत. प्रशासनाने ड्रम, कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर घेऊन थेट पंपांवर यावे लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात डिझेल मिळवण्याच्या गडबडीत आणि रांगेत पुढे जाण्याच्या वादातून एका शेतकऱ्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, महाराष्ट्रात डिझेल मिळेनासे झाल्याने सीमाभागातील अनेक शेतकरी इंधनासाठी शेजारच्या गुजरात राज्यात धाव घेत आहेत. परभणीच्या मानवतमध्ये तुंबळ हाणामारीअशीच एक भीषण आणि हिंसक घटना परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे.
येथे डिझेलचा साठा मर्यादित असल्यामुळे आणि वाहनांची गर्दी वाढल्यामुळे नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा संयम सुटला. डिझेल भरण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये आधी जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर पुढे तुंबळ हाणामारीत झाले. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले असून पंपावर काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मशागतीची कामे खोळंबली; बळीराजा हतबलबुलढाणा, परभणी, नंदुरबार आणि भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून इंधनाचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. डिझेलअभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतातच बंद पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे डिझेल इंजिनद्वारे पाणी उपसा करण्याची सोय आहे, त्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. तसेच शेतमाल बाजारात नेण्यासाठी गाड्यांना इंधन मिळत नसल्याने मोठी फरफट सुरू आहे. एकीकडे तेल कंपन्या आणि प्रशासन इंधनाचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असले, तरी जमिनीवरील वास्तव अत्यंत विदारक आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसत असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
महाराष्ट्र
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



