मुंबई: सन २००१ मधील ऐतिहासिक शेअर बाजार घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आणि दलाल स्ट्रीटचा 'पाईड पायपर' म्हणून ओळखला जाणारा केतन विनायचंद्र पारेख पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. बाजार नियंत्रक संस्थेने एका मोठ्या फ्रंट-रर्निंग (Front-Running) घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, यामध्ये केतन पारेखचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी अंतरिम आदेश जारी करत पारेख आणि त्याच्या टोळीशी संबंधित तब्बल ६५.७७ कोटी रुपयांची अवैध कमाई जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असा उघड झाला घोटाळा:
मुंबई आणि कोलकाता येथील सुमारे २० वेगवेगळ्या ठिकाणांवर ३० महिने मोठी शोधमोहीम राबवून या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावण्यात आला. तपासादरम्यान असे आढळून आले की, सिंगापूरमधील एका मोठ्या व्यापाऱ्याकडे अमेरिकेतील एका मोठ्या फंड हाऊसच्या (FPI) आगामी व्यवहारांची अत्यंत गोपनीय व बिगर-सार्वजनिक माहिती असायची. ही माहिती तो गुपचूप केतन पारेखला पुरवायचा. या माहितीच्या आधारे केतन पारेख बाजारात मोठी खरेदी-विक्री करून कोट्यवधींचा नफा कमावत होता.
'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला खेळ:
मार्केटमधून आधीच १४ वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेला ६२ वर्षांचा केतन पारेख स्वतःचे नाव लपवून पूर्णपणे पडद्यामागून सूत्रे हलवत होता. तो 'बॉस', 'जॅक', 'जॅक न्यू' आणि 'जॅक लेटेस्ट न्यू' अशा बनावट नावांचा वापर करून व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल्सद्वारे कोलकातामधील आपल्या फ्रंट-रनर्सना थेट सूचना द्यायचा. पकडले जाऊ नये म्हणून त्याने बनावट नावांवर घेतलेले तब्बल १० पेक्षा जास्त मोबाईल नंबर्स आणि सिम कार्ड्स वापरले होते. पैशांच्या देवाणभेवाणीसाठी त्याने 'अंगडिया' (पारंपरिक कुरिअर नेटवर्क) चा वापर केला होता.
बड्या गुंतवणूकदारांना मोठा फटका:
या संपूर्ण गैरव्यवहारात ब्रोकरेज फर्म्स आणि कोलकातामधील काही कंपन्यांनी मिळून जवळपास ३८.७ कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला, तर मुख्य गुप्त माहिती पुरवणाऱ्या भागीदाराला २७.०७ कोटी रुपयांची दलाली मिळाली. या प्रकरणात केतन पारेखसह २२ संस्था व व्यक्तींना तात्काळ प्रभावाने शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यास किंवा बाजारातील मध्यस्थांशी जोडले जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. वारंवार बंदी आणूनही डिजिटल युगातील पळवाटांचा शोध घेऊन यंत्रणेला चकवा देण्याच्या पारेखच्या या नवीन कृत्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
- रेल्वेचा मोठा हातोडा! वांद्रे येथील गरीबनगर १०० टक्के अतिक्रमणमुक्त, ४०० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!
- विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार; १ जूनपासून तिकिटे महागणार!
महाराष्ट्र
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
- बळीराजाची थट्टा! ६०२ किलो कांदा विकून आले ३०१ रुपये; खिशातून १,५३८ रुपये मोजण्याची शेतकऱ्यावर आली वेळ
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
- रेल्वेचा मोठा हातोडा! वांद्रे येथील गरीबनगर १०० टक्के अतिक्रमणमुक्त, ४०० बेकायदा बांधकामे जमीनदोस्त!
गुन्हा
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
- पामबीच मार्गावर थरारक अपघात अन् 'ड्रग्ज'चा काळाबाजार उघड! कारमधून ७० लाखांची अफू, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त; चालक फरार!
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!

























Subscribe to my channel



