मुंबई: मुंबईतील इमारतीमध्ये कोअर कटिंग मशिनवर काम करत असताना विजेचा जोरदार शॉक लागून एका ३४ वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना गोरेगाव पश्चिम येथील एका बांधकाम प्रकल्पावर घडली. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी बांधकाम प्रकल्याचे कंत्राटदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृत कामगाराचे नाव मोहम्मद हसनुजूमान दाऊद हुसैन (वय ३४, रा. खेडवाडी) असे आहे. गोरेगावमधील तीन डोंगरी परिसरात असलेल्या 'शीतल कियारा' या रिअल इस्टेट बांधकाम प्रकल्पावर लिफ्ट पिटचे कोअर कटिंगचे काम सुरू होते. यादरम्यान मोहम्मद हा कोअर कटिंग मशिनच्या सहाय्याने काँक्रीट तोडण्याचे काम करत होता. हे काम सुरू असताना अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का (शॉक) बसला आणि तो जागीच कोसळला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू:
विजेचा धक्का बसल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड:
या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाचा गोरेगाव पोलिसांनी कसून तपास केला. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, बांधकाम प्रकल्प कंत्राटदार त्रिविक्रम लिंगराज पाढी याने कामगारांच्या जिवाची काळजी घेतली नाही. त्याने कामगारांना कामासाठी आवश्यक असणारे कोणतेही सुरक्षा साहित्य (Safety Equipment) पुरवले नव्हते, तसेच सुरक्षित विद्युत यंत्रणाही (Safe Electrical System) उपलब्ध करून दिली नव्हती. कंत्राटदाराच्या या गंभीर निष्काळजीपणामुळेच मोहम्मदचा जीव गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, गोरेगाव पोलिसांनी कंत्राटदार त्रिविक्रम पाढी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
शहर
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
महाराष्ट्र
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



