मुंबई: मुंबई महानगरपालिकेत (BMC) गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्यांची (Consultants) नियुक्ती करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पालिकेच्या प्रत्येक कामात सल्लागारांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करत स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांच्या तीव्र आक्षेपानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी सल्लागार नेमणुकीचे सर्वच्या सर्व प्रस्ताव मागे ठेवले (रोखले) आहेत.
प्रशासनाच्या उत्तरांवर सदस्यांची नाराजी:
याआधी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पालिकेतील सल्लागारांच्या वाढत्या संख्येवर आणि त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सल्लागारांवर अबतपर्यंत नेमका किती निधी खर्च झाला, याची सविस्तर यादी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. असे असतानाही, बैठकीत प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन सल्लागार नेमणुकीचे चार वेगळे प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले.
"उद्या अर्थसंकल्प मांडायलाही सल्लागार नेमाल!"
बैठकीत पाणीपुरवठा प्रकल्पांशी (भांडूप, गुंदवली आणि मनोरी) संबंधित सल्लागार नियुक्तीचे चारही प्रस्ताव एका विशिष्ट कंपनीलाच कंत्राट देण्याच्या हेतूने आणल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला. यावर सभागृह नेत्यांनी प्रशासनाला अत्यंत खोचक टोला लगावला. "जर पालिकेच्या अभियंत्यांकडे क्षमता असतानाही प्रत्येक कामासाठी सल्लागारच आणायचे असतील, तर हे रॅकेट उद्ध्वस्त केले पाहिजे. नाही तर उद्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Budget) तयार करण्यासाठी आणि तो सादर करण्यासाठीही तुम्ही सल्लागार नेमाल", अशी संतप्त टीका त्यांनी केली.
पिसे-पांजरपूर प्रकल्पाचा प्रस्तावही अडकला:
यापूर्वी प्रशासनाने पिसे-पांजरपूर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमता वाढीसाठी आणि व्यवस्थापनासाठी सल्लागाराला तब्बल २३ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आणला होता, जो सदस्यांच्या विरोधामुळे आधीच बाजूला ठेवावा लागला होता. पालिकेत सल्लागार उदंड झाले असून मग पालिकेच्या स्वतःच्या अभियंत्यांना बढती कशासाठी द्यायची, असा थेट सवाल लोकप्रतिनिधींनी केला आहे. वाढत्या विरोधामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी सध्या हे सर्व प्रस्ताव स्थगित ठेवले आहेत.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/nxdZr