बीड: एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आषाढी वारी सोहळा आटोपून परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना एका भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. केज-कळंब महामार्गावर साळेगाव परिसराजवळ ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार अशा तीन वाहनांमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एका वृद्ध वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य अकरा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील संत राघोजी महाराज संस्थान बोराळा येथील ह.भ.प. नरहरी नारायण वानखेडे महाराज यांची दिंडी सोहळा आटोपून परतीच्या मार्गाने केजच्या दिशेने जात होती. हा वारकऱ्यांचा ट्रॅक्टर केज ते कळंब दरम्यान खामगाव-सांगोला महामार्ग क्रमांक ५४८-सी वर साळेगाव येथील एका चार्जिंग स्टेशनजवळ आला असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका क्रूझर गाडीने या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या दोन वाहनांची समोरासमोर तीव्र धडक झाल्यानंतर त्याच दिशेने वेगाने जाणारी एक कार देखील या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली. ट्रॅक्टर, क्रूझर आणि कार या तिन्ही वाहनांचा हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरचे हेड पूर्णपणे तुटून त्याचे दोन भाग झाले होते.
या अपघातामुळे परिसरात एकच तारांबळ उडाली आणि मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धावून आले. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघालेल्या एका वृद्ध वारकऱ्याचा उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरमधील आणि क्रूझरमधील इतर प्रवासी मिळून एकूण अकरा जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी केज आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
शहर
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!


























Subscribe to my channel



