Crackdown on Illegal Bike Taxis: Maharashtra Transport Minister Demands FIR Against Ola, Uber, and Rapido!

अनधिकृत बाईक टॅक्सींविरोधात सरकार आक्रमक! ओला, उबर, रॅपिडोवर एफआयआर दाखल करा; प्रताप सरनाईक यांची मागणी

Crackdown on Illegal Bike Taxis: Maharashtra Transport Minister Demands FIR Against Ola, Uber, and Rapido!
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबरक्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे.
कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचे पालन न करता ही प्रवासी वाहतूक सुरू आहे.

विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *