मुंबईतील गोरेगाव हादरले! १८ महिन्यांच्या चिमुकलीला ६ व्या मजल्यावरून खाली फेकल्याप्रकरणी १० वर्षांच्या शेजाऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

मुंबईतील गोरेगाव पूर्व (Goregaon East) परिसरातील एका इमारतीत घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेने संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. १८ महिन्यांच्या एका निष्पाप चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी १० वर्षांच्या अल्पवयीन शेजारी मुलीविरुद्ध हत्येचा (Murder FIR) गुन्हा दाखल केला आहे. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या (Dindoshi Police Station) हद्दीत ही घटना घडली असून, बाल न्याय मंडळाच्या (Juvenile Justice Board) मार्गदर्शनामानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेतील शिवशाही इमारतीमध्ये हा प्रकार घडला. मृत १८ महिन्यांची चिमुकली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आपल्या घराबाहेर गॅलरीमध्ये एका मांजरीसोबत खेळत होती. यादरम्यान, त्याच मजल्यावर राहणारी १० वर्षांची अल्पवयीन मुलगी तिथे आली. तिने चिमुकलीला खुणेने जवळ बोलावले. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू (Accidental Death) अशी केली होती. मात्र, सहाव्या मजल्यावरील सुरक्षा रैलिंगची उंची पुरेशी असल्यामुळे आणि चिमुकली स्वतःहून कशी काय खाली पडू शकते, याबाबत कुटुंबीयांनी शंका उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी तातडीने इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहिल्यानंतर पोलिसांच्या अंगावर काटा आला. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, त्या १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुकलीला उचलले आणि इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील डक्ट एरिया व लिफ्टजवळ असलेल्या जिना मार्गावरून खाली फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, चिमुकलीला खाली फेकून दिल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी कोणतीही भीती न बाळगता तिथून पळून गेली आणि थेट आपल्या घरी निघून गेली तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

इमारतीच्या बेसमेंटमध्ये किंवा डक्ट भागात चिमुकली गंभीर अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी आणि कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चिमुकलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीच्या आकस्मिक मृत्यूच्या नोंदीमध्ये बदल करून १० वर्षांच्या मुलीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी पाळीव प्राण्यावरून किंवा किरकोळ कारणांवरून वाद झाला होता का, या सर्व अँगलवरून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *