
Thane News : अलीकडे लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. सध्या तशीच एक घटना पुन्हा ठाण्यातून समोर आली आहे. मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने केलेल्या हल्ल्यात एका युवकाला आपले पाय गमवावे लागले आहे. जगन लक्ष्मण जंगले असं या व्यक्तीचं नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, जगन लक्ष्मण जंगले हे दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी काम करतात. नेहमीप्रमाणे जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाण्यासाठीलोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली होती. ठाणे स्थानक सोडल्यानंतर जगन दरवाजात उभे होते. तेव्हा यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या हेतुने एका गर्दुल्याने त्यांच्यावर हल्ला केला. जगनच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला.
|
Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर |
त्यामुळे तोल जावून जगन फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाइल देखील गहाळ झाला. या घटनेत जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचं चाक गेलं. त्यामुळ जगन या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने उचललं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जगन यांना दाखल करण्यात आलं होतं.
परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसंच त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रियाकरावी लागणार होती. त्यामुळे त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. जगन हे घरातील एकमेव आर्थिक आधार आहेत. त्यांच्या घरातील परिस्थिती बिकट असून नुकतंच एका महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु या घटनेत त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत.
असे प्रकार नेहमीच घडत असतात. रेल्वे पोलीस केवळ तपास करत आहोत, अशी माहिती देतात. जर अश्या प्रकारे रेल्वे प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ होणार असेल, तर यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं नागरिक म्हणतआहेत. आता याप्रकरणी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. सध्या त्यांच्यावर ठाण्यात खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




