नवी मुंबई: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीच्या नावाखाली प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याचा कारनामा उघडकीस आला आहे. विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून ३५ कोटींचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली) याला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एका 'स्पेलिंग'ने फिरवली तपासाची चक्रे
अभिषेकने अत्यंत हुशारीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीची हुबेहूब नक्कल केली होती. २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नामक व्यक्तीने जेव्हा या पत्राची पडताळणी करण्यासाठी आयुक्तांचे कार्यालय गाठले, तेव्हा फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. डॉ. गेडाम यांच्या स्वाक्षरीतील 'Praveen' या नावाऐवजी अभिषेकने 'Pravin' असे स्पेलिंग लिहिले होते. याच एका लहानशा चुकीने त्याचा ३५ कोटींचा हा डाव उधळला गेला.
सॉफ्टवेअर नाही, तर 'ॲप'चा आधार
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, आरोपीने कोणत्याही महागड्या सॉफ्टवेअरचा वापर न करता केवळ मोबाईलमधील 'ScanOnO' या साध्या ॲपद्वारे ही बनावट स्वाक्षरी तयार केली होती. तांत्रिक शिक्षणाचा उपयोग विधायक कामांऐवजी फसवणुकीसाठी करत त्याने चक्क शासकीय मोहोर आणि स्वाक्षरीची हुबेहूब नक्कल करून बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार केले होते.
कुंभमेळा आयुक्तांच्या नावेही बनावट पत्रे
अभिषेकच्या मोबाईलची तपासणी केली असता केवळ डॉ. गेडाम यांचीच नव्हे, तर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या नावाने तयार केलेली बनावट पत्रेही पोलिसांना सापडली आहेत. कुंभमेळ्यातील 'सीसीटीव्ही सर्वेक्षण' आणि 'एआय' आधारित सुरक्षा यंत्रणेचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने एका कंत्राटदाराकडे २० लाख रुपयांची मागणी केल्याचेही उघड झाले आहे.
मूळचा वर्धा येथील असलेला हा तरुण नवी मुंबईत राहून हे रॅकेट चालवत होता. या प्रकरणामागे अजून काही मोठे मासे आहेत का, याचा तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे करत आहेत. या घटनेमुळे शासकीय कामकाजातील डिजिटल सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
- मुंबई मेट्रोची ऐतिहासिक भरारी! १०० किमीचे जाळे पूर्ण; आता ठाणे, नवी मुंबई आणि विरारपर्यंत विस्तार
महाराष्ट्र
- संजय राऊत म्हणजे काँग्रेसने पाळलेलं 'पिल्लू'; नवनाथ बन यांचा घणाघात, उद्धव ठाकरेंनाही दिला आंदोलनाचा खोचक सल्ला
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
- डहाणूत मैत्रीला काळिमा! भावाच्या मित्रानेच अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन लुटली तिची अब्रू
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
गुन्हा
- डहाणूत मैत्रीला काळिमा! भावाच्या मित्रानेच अल्पवयीन बहिणीला जंगलात नेऊन लुटली तिची अब्रू
- नसरापूर हत्याकांड: मध्यरात्री गुन्ह्याचा 'सीन रिक्रिएशन'; नराधमाची क्रूरता पाहून पोलीसही हादरले
- अकोला हादरले! ६० वर्षीय नराधमाचे १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम फरार, पोलिसांकडून शोध सुरू
- छत्रपती संभाजीनगर हादरले! ६ वर्षीय चिमुरडीचा शेततळ्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
राजकीय
- बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ
- निकालांनंतर अग्निहोत्रींचा धमाका: "बंगाल आता मुक्त झाला", ममतांच्या पराभवानंतर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया.
- तमिळनाडूच्या राजकारणात 'थलपती' वादळ: विजयाने बदलली सत्तेची गणितं!
- ५ राज्यांचा निवडणूक निकाल : बंगालमध्ये भाजपची मोठी आघाडी, तामिळनाडूत TVKचा उदय; जाणून घ्या संपूर्ण चित्र
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?




















Subscribe to my channel




