
Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पोरखेळ अद्याप सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधीक्षक पदासाठी नवीन डॉक्टरांची नियुक्त करण्यात आली आहे. आता हे नवनियुक्त वैद्यकीय अधीक्षक बदला यासाठी ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी शासनाला पत्र लिहिलं आहे.
ससूनचे डीन डॉक्टर काळे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहून वैद्यकीय अधीक्षक बदलण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय अधीक्षक पदी शुक्रवारीच डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र यल्लाप्पा जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठी पात्र नसल्याचे डीन डॉक्टर काळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
|
Pune Crime : आईच्या ऑपरेशनसाठी फोडलं शेजाऱ्याचं घर; पळवले लाखो रुपयांचे दागिने |
पत्रामधून डॉक्टर यल्लाप्पा जाधव यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. या आधी वैद्यकीय उपअधीक्षक असताना जाधव यांनी महिला सुरक्षा रक्षकाची छेड काढल्याचा आणि त्याप्रकरणी चौकशी होऊन त्यांना पदावरुन हटवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
तसेच, याआधी वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार जाधव यांच्याकडे असताना त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली होती. तेव्हाही जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. डॉक्टर जाधव वैद्यकीय अधीक्षक पदासाठीचे पात्रता निकष पूर्ण करत नसल्याचा ठपका डीन डॉक्टर काळे यांनी ठेवला आहे.
अधीक्षक पदासाठी उमेदवाराला किमान पाच वर्षे प्राध्यापक म्हणून काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. मात्र जाधव यांच्याकडे तो अनुभव नाही. लवकरच भारतीय आयुर्वेद ज्ञान आयोगाकडून ससूनचे इन्स्पेक्शन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर जाधव यांची नियुक्ती अडचणीची स्थळे त्यामुळे डॉक्टर काळे यांनी जाधव यांना बदलण्याची मागणी केली आहे.
अधीक्षकपदासाठी मीच पात्र, दोन डॉक्टरांचा पदावर दावा
२२ एप्रिल रोजी डॅाक्टर यल्लापा जाधव यांना ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा भार सोपवण्यात आला. मात्र याच या पदावर दोन डॉक्टरांकडून दावा करण्यात आला होता. डॅाक्टर अजय तावरे यांच्याकडील ससून रुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार शुक्रवारी काढून घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी डॅाक्टर यल्लापा जाधव आपल्या सेवेत रुजू झाले. मात्र कार्यालयात वैद्यकीय अधीक्षक पदाच्या खुर्चीवर तावरे बसले होते. त्यांनी देखील आपण वैद्यकीय अधीक्षक असल्याचा दावा केला होता. यावेळी दोन्ही डॉक्टरांनी या कार्यालयात ठाण मांडलं होतं.
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!


























Subscribe to my channel




