
Baramati : भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ६ ते ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैनकवाडी फाट्याजवळ प्रवाशांना अडवून मारहाण व लूटमार
फिर्यादी विश्वराजे चंद्रशेखर पाटील व त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कॅरी गाडीतून प्रवास करत असताना, जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक गाडी अडवली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले. या हल्ल्यात फिर्यादीची बॅग, मोबाईल फोन, चार्जिंग पॉवर बँक, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा एकूण १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हल्लेखोरांनी लुटून नेला.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून तातडीने शोधमोहीम
टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी आरोपींचे वर्णन व वाहनांच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. याबाबत भिगवण, दौंड व यवत पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.
केडगाव चौफुला-सुपा रोडवर थरारक पाठलाग अन् अटक
मोटारसायकल व रिक्षाच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी सखोल शोधमोहीम राबवत पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले, तर एक आरोपी फरार आहे. या आरोपींनी कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र महेश खडके यांच्यावर सुद्धा कोयत्याने गंभीर वार केला होता.
पुण्यातील चार आरोपी जेरबंद; शस्त्रे व मुद्देमाल जप्त
अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कृष्णा राजू मोरे (मार्केट यार्ड), रुपेश सुरेश आडवाल (कात्रज), संकेत अनंत शिलते (पर्वती दर्शन) आणि ईश्वर महादेव मिसाळ (कात्रज) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमने केली. या संपूर्ण कारवाईत यवत व भिगवण पोलीस स्टेशनच्या पथकांसह निरगुडे, भिगवण आणि कुरकुंभ परिसरातील स्थानिक नागरिकांनी आरोपी शोधण्यात मोलाचे सहकार्य केले.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel




1 thought on “Baramati Crime : रात्रीचा थरार! कोयत्याने हल्ला करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा पलटवार; प्रवाशांना अडवून लुटमार करणाऱ्यांचा खाकीने केला करेक्ट कार्यक्रम”