पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना किंवा प्रायोगिक तत्त्वावर (Pilot basis) सुरू असलेली 'रॅपिडो' (Rapido) कंपनीची बाईक टॅक्सी सेवा तातडीने बंद करण्याचे स्पष्ट आदेश पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (RTA) बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. शासनाकडून रीतसर परवाना मिळेपर्यंत ही सेवा तात्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा कंपनीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुण्यातील विविध ऑटो-रिक्षा आणि कॅब चालक संघटनांनी दिलेल्या तक्रारींनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरटीएची (RTA) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला.
परवान्याशिवाय सेवा चालवण्यास मनाई
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बैठकीत स्पष्ट केले की, "रॅपिडो कंपनीने शासनाचा अधिकृत परवाना न घेताच शहरात प्रायोगिक तत्त्वावर दुचाकी ॲग्रिगेटर (बाईक टॅक्सी) सेवा सुरू केली होती. जोपर्यंत राज्य सरकारकडून कायदेशीर परवाना दिला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कंपनीला अशी सेवा चालवता येणार नाही. त्यामुळे ही सेवा आजपासूनच तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) पासून त्यांच्यावर थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील."
नियम व भाडेदराबाबत कडक निर्देश
बैठकीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) इतर ॲग्रिगेटर कंपन्यांनाही (ओला, उबर इत्यादी) कडक शब्दांत ताकीद दिली आहे:
-
आरटीओच्या दरांचे पालन: ॲप आधारित कंपन्यांनी स्वतःचे मनमानी दर न लावता आरटीओने मंजूर केलेले अधिकृत भाडेदरच प्रवाशांकडून आकारले पाहिजेत.
-
अॅपवर अधिकृत दरांची माहिती: ॲग्रिगेटर कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल ॲपवर RTA ने मंजूर केलेले सरकारी भाडेदर स्वतंत्र कॉलममध्ये प्रवाशांना स्पष्ट दिसतील अशा प्रकारे प्रदर्शित केले पाहिजेत.
-
चालकांचा वाटा: प्रवाशांकडून आकारल्या जाणाऱ्या एकूण भाड्यापैकी किमान ८० टक्के रक्कम चालकांना मिळाली पाहिजे आणि कंपन्यांनी आपला महसुली डेटा दरमहा प्रशासनाकडे सादर केला पाहिजे.
रिक्षा व कॅब चालक संघटनांचा आक्रमक पवित्रा
बैठकीत उपस्थित विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
-
नितीन पवार (अध्यक्ष, रिक्षा पंचायत): "पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता बाईक टॅक्सीला अजिबात परवानगी देऊ नये. ॲग्रिगेटर कंपन्या त्यांच्या ॲपद्वारे स्वयंघोषित दर ठरवून सरकारी यंत्रणेच्या अधिकारावर गदा आणतात आणि प्रवाशांची दिशाभूल करतात. या मनमानी कारभाराला आळा बसलाच पाहिजे."
-
डॉ. केशव क्षीरसागर (अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा): "सरकारी भाडेदराचे उल्लंघन करून चालक व प्रवाशांची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही. कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व रिक्षा-कॅब संघटना एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील."
-
डॉ. बाबा कांबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत): "भांडवलदार कंपन्या केवळ नफा कमावण्यासाठी गोरगरीब चालकांचे शोषण करत आहेत. प्रशासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई झाली पाहिजे."
प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे पुण्यातील विनापरवाना बाईक टॅक्सी सेवेला चाप बसला असून, ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांच्या मनमानी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




