बीड | प्रतिनिधी
१ मे रोजीची महाराष्ट्र दिनाची सुट्टी आणि त्यानंतर आलेल्या रविवारमुळे बीड जिल्ह्यात इंधन टंचाईचे संकट गडद झाले आहे. शहरात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम असून, ज्या पंपांवर साठा उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. टँकर येताच काही तासांतच साठा संपत असल्याने सर्वसामान्यांची मोठी ओढाताण होत आहे.
साठेबाजीमुळे टंचाईची तीव्रता वाढली
जिल्ह्यात शनिवारी रात्री ७५ टँकर उपलब्ध झाले होते, मात्र नागरिकांनी भीतीपोटी मोठ्या प्रमाणात साठा केल्याने रविवारी सकाळीच पंप कोरडे झाले. प्रत्यक्षात इंधनाचा तुटवडा १० ते २० टक्के असताना, साठेबाजीमुळे तो अधिक तीव्र भासत आहे. विशेषतः शेतकरी भविष्यातील गरजेपोटी जास्तीचे डिझेल कॅनमध्ये भरून ठेवत आहेत, ज्यामुळे साठा लवकर संपत आहे. कॅनमध्ये इंधन देण्यास नकार दिल्यास कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा
या सततच्या इंधन टंचाईच्या निषेधार्थ 'विश्वगती मोटार चालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन'च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देण्यात आले. इंधन टंचाईमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रशासनाकडून उपाययोजनांची अपेक्षा
सलग सुट्ट्यांमुळे वितरणाचे संतुलन बिघडते, त्यामुळे महिन्यातील प्रत्येक दिवशी डेपो सुरू ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. तसेच, कोणत्या पंपावर इंधन उपलब्ध आहे याची माहिती आदल्या दिवशी वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करावी, जेणेकरून नागरिकांची भटकंती थांबेल आणि पंपांवरील गर्दी नियंत्रित होईल. सध्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३८ टँकर उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शहर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
महाराष्ट्र
- अमरावती: पेपरफुटीने संतापला युवा वर्ग! अमरावतीत MPSC विरोधात शेकडोंचा 'आक्रोश मोर्चा'; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
- पुणे: भीमाशंकरवाडीतील ९६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून हिरवा कंदील, प्रत्येकाला मिळणार ५०० चौरस फुटाचा भूखंड
- यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!




























Subscribe to my channel




