पुण्यातील मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात झाला. हॉटेल पिगारासमोर झालेल्या या अपघातात एका २२ वर्षीय पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ८:०५ च्या सुमारास कंटेनर (क्रमांक MH 04 MH 6303) चालक मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. याच वेळी त्याने समोरून जाणाऱ्या पिकअप गाडीला (क्रमांक MH 42 AQ 6142) मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. पिकअप गाडी दोन कंटेनरच्या मध्ये अडकल्याने चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
एकाचा मृत्यू, एक गंभीर:
या भीषण अपघातात पिकअप चालक महादेव उत्तम शेंडे (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र सुमित दत्तू कांबळे (वय २२, रा. इंदापूर) हा गंभीर जखमी झाला आहे. सुमितला तातडीने सिंहगड रोडवरील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
महामार्गावर वाहतूक कोंडी:
या अपघातामुळे महामार्गावरील पुढच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. एका तरुण मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे नऱ्हे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुण्यात खळबळ! मंत्री अतुल सावे यांच्या ओएसडीवर पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
- अजिंठा घाटात १२ तास 'ट्रॅफिक जाम'; भररस्त्यात कंटेनर अडकला, शेकडो पर्यटक अन् विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल!
- खाकी वर्दीतल्या संघर्षाची 'स्टोरी'; कधी वडापाववर दिवस काढले, तर कधी गाडीतच रात्र!
- 'आमची जमीन, आमची मोजणी, तरीही पोलिसांना मोजले ३० लाख!' शेजारच्याच्या त्रासाला कंटाळून सोलापूरचे शेतकरी हवालदिल
महाराष्ट्र
- ४ वर्षांचं प्रेम, आळंदीत गुपचूप लग्न; पण 'पैशांअभावी' एका महिन्यातच मोडला संसार!
- पुण्यात खळबळ! मंत्री अतुल सावे यांच्या ओएसडीवर पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
- बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती द्या आणि १ लाख मिळवा; अकोला जिल्हा प्रशासनाची मोठी घोषणा!
- मानोरा तालुक्यात प्रदूषणाचा 'धूर'; अवैध वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासन ढिम्म!
गुन्हा
- पुण्यात खळबळ! मंत्री अतुल सावे यांच्या ओएसडीवर पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
- बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती द्या आणि १ लाख मिळवा; अकोला जिल्हा प्रशासनाची मोठी घोषणा!
- १० वर्षांचा संसार, 'ड्रिंक्स पार्टी' अन् प्रियकरासोबत पलायन; पत्नीने पतीलाच लावला चुना!
- धक्कादायक! विख्यात UPSC मार्गदर्शक शुभ्रा रंजन यांना ओलीस ठेवून १.९० कोटींची लूट; माजी विद्यार्थ्याला आयसीयू मधून बेड्या
राजकीय
- बारामतीचा रणसंग्राम: 'हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं'; पराभवानंतरही करूणा मुंडे यांचा बाणा कायम
- बारामतीत सुनेत्रा पवारांची 'पॉवर'फुल मुसंडी; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विजयाचा गुलाल निश्चित!
- पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान: ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप लढतीत नवा ट्विस्ट; तज्ज्ञांनी वर्तवला 'सायलेंट व्होटर्स'चा अंदाज
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- ९० च्या दशकातील सुपरस्टार राहुल रॉय ट्रोल; 'आशिकी' फेम अभिनेत्याचा रील व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
- रणवीर सिंगचा धमाका आता जपानमध्ये! 'ऑपरेशन धुरंधर' १० जुलै रोजी जपानमध्ये होणार प्रदर्शित
- जय शिवराय’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील दुसरे भव्य गीत प्रदर्शित; ऐकताच अंगावर रोमांच
- ३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




