पुणे: ऑनलाईन डेटिंग ॲपवरून ओळख करून घेऊन, त्यानंतर व्यवसायाचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 'अनाया शर्मा' आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 'बीलॉंग' (Belong) नावाच्या डेटिंग ॲपवर एका तरुणीशी ओळख झाली होती. तिने स्वतःच नाव अनाया शर्मा असं सांगितलं. १३ फेब्रुवारी २०२६ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ही ओळख वाढत गेली. दरम्यान, आरोपी अनाया शर्मा हिने फिर्यादींना 'ड्रॉप शिपिंग' (Drop Shipping) बिझनेसबाबत माहिती दिली आणि यात मोठा नफा असल्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर एका व्हॉट्सॲप नंबरवरून व्यवसायाची अधिक माहिती देऊन फिर्यादींना एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकद्वारे एक अकाउंट तयार करण्यास सांगून, ऑनलाइन प्रॉडक्टची खरेदी-विक्री करण्याच्या नावाखाली फिर्यादींचा विश्वास संपादन केला. आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांवर फिर्यादींना विविध बँक खात्यांमध्ये एकूण १५ लाख ३१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले.
अशी झाली फसवणूक
मोठी रक्कम गुंतवल्यानंतरही फिर्यादींना कोणताही परतावा (Profit) मिळाला नाही. जेव्हा त्यांनी आपली मूळ रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.
पोलीस कारवाई
हडपसर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यात खालील कलमांचा समावेश आहे:
भारतीय न्याय संहिता २०२३: कलम ३१९ (२) (तोतयागिरी करून फसवणूक), ३१८ (४) (फसवणूक), ३ (५) (सामायिक उद्देश).
माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act): कलम ६६.
पुणे पोलीस सध्या संबंधित व्हॉट्सॲप नंबरचा वापरकर्ता आणि ज्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्या खातेधारकांचा शोध घेत आहेत.
नागरिकांना आवाहन: डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखीनंतर कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या लिंकवर पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




