नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!

नागपूर: कुही गावातील ओळखीच्या व्यक्तींकडून घेतलेली उधार रक्कम परत देणे शक्य न झाल्याने तसेच उधार रक्कम देणाऱ्यांनी रक्कम परत घेण्यासाठी तगादा लावल्याने शेतकऱ्याने त्याच्या शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना पाचगाव (ता. उमरेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव शिवारात बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

तेजराम श्रावण ढोणे (५०, डोंगरगाव, ता. कुही) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची डोंगरगाव शिवारात चार एकर शेती असून, त्याला दारूचे व्यसन होते. शिवाय, त्याचा मुलगा दुग्धव्यवसाय करतो. त्याने गावातील काही व्यक्तींकडून उधार रक्कम घेतली होती. संबंधितांनी त्याला पैसे परत मागायला सुरुवात केली होती. रक्कम परत देणे त्याला शक्य होत नव्हते. याच विवंचनेत तो बुधवारी शेतात गेला आणि शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतला.

तो शेतातील झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पाचगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *