सोलापूर/मुंबई:
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर ९ महिला गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
२२ एप्रिल रोजी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना 'गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे' (CPDS) हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना तीन महिला संशयास्पद रितीने फिरताना दिसल्या. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडून दिले, मात्र त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. या महिला लातूर एक्सप्रेसमध्ये चढल्याचे पाहिल्यानंतर आरपीएफने सोलापूर मार्गावर 'हाय अलर्ट' जारी केला.
असा उधळला डाव:
संशयित महिला आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या आणि तिथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या. मात्र, आरपीएफचे पथक आधीच सावध होते. हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने आणि फोटोंच्या आधारे या महिलांवर सतत पाळत ठेवली.
सोलापूर स्थानकावर अटक:
सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर स्थानकावर पोहोचताच, लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफच्या पथकाने सापळा रचून सर्व ९ महिलांना ताब्यात घेतले. या महिला १८ ते ४० वयोगटातील असून त्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हयातील रहिवासी आहेत.
पुढील तपास सुरू:
अटक करण्यात आलेल्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी) अंतर्गत कुर्डुवाडी जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागांत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून आरपीएफच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. प्रवाशांनी सतर्क राहावे आणि काहीही संशयास्पद आढळल्यास १३९ वर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
शहर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
- नागपूर: आई-वडिलांच्या अहंकाराची शिक्षा चिमुकलीला; कौटुंबिक वादात ९ महिने शाळेपासून दूर ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा संताप
- अमरावती: मेळघाटात अंधश्रद्धेचे काळे सावट; उपचाराच्या नावाखाली अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकल्या बाळाच्या पोटाला दिले गरम सळईचे चटके, महिला भूमकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- पुणे: रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून बी. जे. मेडिकल कॉलेजचा एमबीबीएस विद्यार्थी तन्मय वंगे हॉस्टेल सोडून निघून गेल्याने मोठी धावपळ
- नागपूर: आई-वडिलांच्या अहंकाराची शिक्षा चिमुकलीला; कौटुंबिक वादात ९ महिने शाळेपासून दूर ठेवल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा संताप
- जळगाव: शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे ५० ते ६० घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
गुन्हा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




