सोलापूर/मुंबई:
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करत सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर ९ महिला गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
२२ एप्रिल रोजी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना 'गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे' (CPDS) हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना तीन महिला संशयास्पद रितीने फिरताना दिसल्या. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडून दिले, मात्र त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. या महिला लातूर एक्सप्रेसमध्ये चढल्याचे पाहिल्यानंतर आरपीएफने सोलापूर मार्गावर 'हाय अलर्ट' जारी केला.
असा उधळला डाव:
संशयित महिला आरोपी जेऊर स्थानकावर उतरल्या आणि तिथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने १२११५ सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या. मात्र, आरपीएफचे पथक आधीच सावध होते. हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने आणि फोटोंच्या आधारे या महिलांवर सतत पाळत ठेवली.
सोलापूर स्थानकावर अटक:
सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर स्थानकावर पोहोचताच, लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफच्या पथकाने सापळा रचून सर्व ९ महिलांना ताब्यात घेतले. या महिला १८ ते ४० वयोगटातील असून त्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हयातील रहिवासी आहेत.
पुढील तपास सुरू:
अटक करण्यात आलेल्या महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी) अंतर्गत कुर्डुवाडी जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी सोलापूर आणि पुणे या दोन्ही विभागांत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून आरपीएफच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. प्रवाशांनी सतर्क राहावे आणि काहीही संशयास्पद आढळल्यास १३९ वर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
शहर
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
- पुणे: पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर! विजयासाठी केवळ १८१६ मतांची गरज, भाजपच्या स्मिता जाधव पिछाडीवर
- पुणे: शिक्षक मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयंत आसगावकर पराभूत, भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजयाचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर महत्त्वाची बैठक! अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सकारात्मक मदतीची ग्वाही
- पुणे: 'म्हाडा'च्या घरांसाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद! तब्बल २.३८ लाख अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी उरले केवळ ३ दिवस
- रायगड: महायुतीत मोठा वाद पेटला! खासदार सुनील तटकरेंनी आपल्याला संपवण्याची सुपारी दिल्याचा शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा सनसनाटी आरोप
- पुणे: राणा सूर्यवंशींना 'वाय प्लस' सुरक्षा कशासाठी? आमदार रोहित पवारांचा संतप्त सवाल; सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!


























Subscribe to my channel




