
Pune : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक अखेर तब्बल 32 तासांनंतर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच च्या सुमारास पलटी झालेला गॅस टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला, त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहनांना सोडण्यात आले. सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लेनवर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. तब्बल 32 तासांनंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ लागल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
मंगळवारी, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा कॅप्सूल टँकर पलटी झाला होता. या अपघातानंतर टँकरमधून प्रोफोलिन नावाचा ज्वालाग्रही गॅस गळती होऊ लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली होती.
|
Pune : आज पुण्यात बत्तीगुल; दुरुस्ती कामासाठी ‘या’ भागांत 7 तास वीजपुरवठा बंद, महावितरणाचा निर्णय |
काही प्रमाणात गॅस लिकेज थांबवल्यानंतर दुपारी मुंबई लेनवरून दोन मार्ग पुण्याच्या दिशेने आणि एक मार्ग मुंबईच्या दिशेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वेळानंतर पुन्हा एकदा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर कॅप्सूल टँकरचे केबिन क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आणि वाहतूक अत्यंत कासवगतीने सुरू करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोन- तीन टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गॅस काढण्यात आला. टँकरमध्ये केवळ 10 ते 20 टक्के गॅस शिल्लक राहिल्यानंतर अखेर चार क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त गॅस टँकर पूर्णपणे बाजूला करण्यात आला. त्यानंतर रात्री पावणेदोनच्या सुमारास, म्हणजेच तब्बल 32 तासांनंतर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरू झाली.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ एका गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल 32 तास सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरण्यात आले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक प्रवासी 15 ते 20 तास वाहतूक कोंडीत अडकले होते, तर काहींनी कंटाळून पर्यायी मार्गांचा वापर केला. टोल भरूनही अशा प्रकारची गैरसोय सहन करावी लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराचे रुग्णही अडकले होते. अनेक रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते, मात्र तब्बल तासन्तास वाहतूक कोंडीत अडकल्याने ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. या संपूर्ण घटनेला जबाबदार नेमकं कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरलं गेलं का, हाही सवाल केला जात आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर किंवा संबंधित यंत्रणांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.



























Subscribe to my channel



Time to try my luck with xổ số bạc liêu! Always hopeful! Maybe today is my lucky day! Check it out yourself! xổ số bạc liêu
Roongf bachj kim hả? Lần đầu nghe tên này luôn á. Để xem có gì hay ho không nè. Thử vận may thôi! Vào xem roongf bachj kim ngay thôi.
Alright, k88bet, eh? I’ve tried it. The odds are decent and the site’s not bad. I’d say give it a look if you’re searching for something new. Give it a try k88bet.