पुणे: पिंपळे गुरव संसाराचा गाडा चालविण्यासाठी चार भिंतींत राहून जबाबदाऱ्या पार पाडण्यापेक्षा स्वकष्टातून हातभार लावला पाहिजे, असा निर्धार करून पिंपळे गुरवच्या शीतल राजेश मोळावडे यांनी रिक्षाचे स्टिअरिंग हाती घेतले. वाहन चालविण्याची आवड, काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हे धाडस केले. समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील, याची पर्वा न करता त्या आत्मविश्वासाने रस्त्यावर उतरल्या.
पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी नगरातील शीतल केवळ रिक्षाचालक नाहीत, तर कष्ट, प्रामाणिकपणा आणि आत्मनिर्भरतेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कणखर महिला आहेत. नातेवाइकांकडून मिळालेली प्रेरणा आणि स्वतःला असलेली वाहन चालविण्याची आवड, तसेच संसाराला हातभार लावावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, ही इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे पती राजेश खासगी कंपनीत काम करतात. त्यांनी पत्नीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. रिक्षा चालविण्याच्या कामाला विरोध केला नाही. त्यांच्या साथीमुळे शीतल यांना पुढे जाण्याचे बळ मिळाले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रिक्षा खरेदी केली. आवश्यक वाहनचालक परवाना मिळवला आणि वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.
सकाळी घरातील कामे आटोपून त्या रिक्षा घेऊन घराबाहेर पडतात. मिळेल ते भाडे स्वीकारून प्रामाणिकपणे कष्ट करणे, हाच त्यांच्या दिनक्रमाचा भाग झाला आहे.
कामाची लाज न बाळगता कष्ट करण्याची तयारी
शीतल मूळच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपडी गावच्या. कोणतेही काम छोटे नाही, याची शिकवण वडिलांकडून मिळाली. त्यामुळे समाजात वावरताना कामाची लाज न बाळगता कष्ट करण्याची तयारी, परिस्थितीशी दोन हात करण्याची हिंमत आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याची वृत्ती, या गुणांच्या बळावर त्यांनी वेगळी वाट तयार केली.
"लोक काय म्हणतील, यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी मी काय करू शकते, याचा विचार केला. माझ्यासाठी ही केवळ रिक्षा नाही, तर स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची वाट आहे. मेहनत करून संसाराला हातभार लावता येतो, यापेक्षा मोठे समाधान नाही.
शीतल मोळावडे, रिक्षाचालक
पिंपळे गुरव
शहर
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
महाराष्ट्र
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सांगली: गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीतून पत्ता कट
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!


























Subscribe to my channel




