Mumbai–Pune Expressway Traffic Update : 32 तासांनंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर; प्रवाशांचे हाल, घटनेला जबाबदार कोण?

Pune : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक अखेर तब्बल 32 तासांनंतर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच च्या सुमारास पलटी झालेला गॅस टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला, त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहनांना सोडण्यात आले. सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लेनवर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी काहीसा वेळ लागणार आहे. तब्बल 32 तासांनंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ लागल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

मंगळवारी, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा कॅप्सूल टँकर पलटी झाला होता. या अपघातानंतर टँकरमधून प्रोफोलिन नावाचा ज्वालाग्रही गॅस गळती होऊ लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली होती.

Pune : आज पुण्यात बत्तीगुल; दुरुस्ती कामासाठी ‘या’ भागांत 7 तास वीजपुरवठा बंद, महावितरणाचा निर्णय

काही प्रमाणात गॅस लिकेज थांबवल्यानंतर दुपारी मुंबई लेनवरून दोन मार्ग पुण्याच्या दिशेने आणि एक मार्ग मुंबईच्या दिशेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, काही वेळानंतर पुन्हा एकदा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर कॅप्सूल टँकरचे केबिन क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आणि वाहतूक अत्यंत कासवगतीने सुरू करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोन- तीन टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गॅस काढण्यात आला. टँकरमध्ये केवळ 10 ते 20 टक्के गॅस शिल्लक राहिल्यानंतर अखेर चार क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त गॅस टँकर पूर्णपणे बाजूला करण्यात आला. त्यानंतर रात्री पावणेदोनच्या सुमारास, म्हणजेच तब्बल 32 तासांनंतर पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक सुरू झाली.

या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ एका गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल 32 तास सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरण्यात आले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक प्रवासी 15 ते 20 तास वाहतूक कोंडीत अडकले होते, तर काहींनी कंटाळून पर्यायी मार्गांचा वापर केला. टोल भरूनही अशा प्रकारची गैरसोय सहन करावी लागल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराचे रुग्णही अडकले होते. अनेक रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते, मात्र तब्बल तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकल्याने ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. या संपूर्ण घटनेला जबाबदार नेमकं कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरलं गेलं का, हाही सवाल केला जात आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर किंवा संबंधित यंत्रणांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



विडियो गॅलेरी

4 thoughts on “Mumbai–Pune Expressway Traffic Update : 32 तासांनंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर; प्रवाशांचे हाल, घटनेला जबाबदार कोण?

  1. Alright, k88bet, eh? I’ve tried it. The odds are decent and the site’s not bad. I’d say give it a look if you’re searching for something new. Give it a try k88bet.

Leave a Reply to xổ số bạc liêu Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *