
Pune : पुणे रेल्वे विभागातून दुसऱ्या शहरांसाठी पाठविण्यात येणारे प्रत्येक पार्सल सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कॅन होणार आहे. त्यासाठी पुणे रेल्वे विभागातील आठ स्थानकावर ११ पार्सल स्कॅनर मशिन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चार पार्सल स्कॅनर पुणे रेल्वे स्थानकावर बसवण्यात येणार आहेत. पार्सल स्कॅनरमधून तपासणी केल्यामुळे पार्सलमधून धोकादायक वस्तू पाठवण्याच्या प्रकारांना अटकाव घालता येणार आहे.
मध्य रेल्वेमध्ये पुणे हा एक महत्त्वाचा विभाग आहे. पुणे रेल्वे विभागात एकूण ८३ स्टेशन आहेत. येथून दिवसाला साधारण दोनशेपेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात. त्यामधून दररोज पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे रेल्वे विभागाला प्रवासी व मालवाहतूक नंतर पार्सलमधून सर्वाधिक उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी पुणे रेल्वेला पार्सलच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
|
Pune : शिवसेनेच्या प्रचारावेळी पुण्यात गोंधळ; शहरप्रमुखांच्या वाहनावर दगडफेक, उमेदवाराला दुखापत |
पार्सलच्या उत्पन्नामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. त्यामुळे आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पार्सलदेखील स्कॅन करूनच पाठवले जाणार आहे. त्यासाठी पुणे रेल्वे विभागाने वेगवेगळ्या स्थानकासाठी पार्सल स्कॅनर देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार रेल्वे बोर्डाने पुणे विभागाला ११ पार्सल स्कॅनर घेण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी सर्वाधिक पार्सल पाठवल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकावर चार पार्सल बसवण्यात येणार आहेत. कोल्हापूर, दौंड, मिरज, हडपसर, खडकी, अहिल्यानगर, साईनगर शिर्डी या ठिकाणी प्रत्येकी एक पार्सल स्कॅनर बसवण्यात येणार आहे.
रेल्वेची पार्सल सेवा
पुणे विभागात रेल्वेतून छोट्या वस्तूपासून ते दुचाकी गाड्यांपर्यंत पार्सल सेवा दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने फळे, भाज्या, औद्योगिक कंपन्याची उत्पादने, लगेज, कपडे, कॉस्मेटिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू पाठविल्या जातात. या वस्तू पॅकिंग केलेल्या असतात. आतामध्ये पॅकिंग पार्सलमध्ये काय पाठवले जाते हे रेल्वे प्रशासनाला समजत नव्हते. त्यामुळे धोकायदायक वस्तूदेखील पार्सल होत असतीस, तर समजत नव्हते.
त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून जाणारे प्रत्येक पार्सल स्कॅन करूनच पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्कॅनिंग मशिनसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजरी मिळाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेला त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहर
- मुंबई: १०५ दिवसांत सव्वा लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचे मराठीवर प्रभुत्व; मराठी सक्तीची नाही, भक्तीची भाषा एकनाथ शिंदे
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
गुन्हा
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन



























Subscribe to my channel



1 thought on “Pune : पुणे रेल्वे अलर्ट मोडवर; 8 स्थानकांवर पार्सल स्कॅनर, संशयास्पद वस्तूंवर तात्काळ कारवाई”