पुणे: प्रसिद्ध उद्योजक आणि राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीमधील कटफळ तथा विमानतळ परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठी सनसनाटी पसरली असून, व्यावसायिक वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात उद्योजक राणा सूर्यवंशी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सुरुवातीला बारामतीमधील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राणा सूर्यवंशी हे बारामती विमानतळ परिसराजवळ असताना ही घटना घडली. दोन अज्ञात हल्लेखोर पुष्पगुच्छ (बुके) देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आले. अत्यंत चलाखीने चाहत्यांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या वेशात जवळ आलेल्या या हल्लेखोरांपैकी एकाने रिव्हॉल्व्हर व दुसऱ्याने धारदार शस्त्र (सत्तूर / कोयता) सोबत बाळगले होते. पुष्पगुच्छ देण्याचा बनाव करत अचानक त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर जवळून सत्तूरने वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला आणि शरीराला दुखापत झाली. या घटनेदरम्यान काही गोळीबार झाल्याची चर्चा पसरली होती, मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी स्पष्ट केले की, हल्लेखोराने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असावा किंवा धारदार शस्त्राने (सत्तूरने) त्यांच्यावर वार करण्यात आले आहेत, ज्याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
पोलिसांची कारवाई आणि यंत्रणा: घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांच्या शोधार्थ विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून, व्यावसायिक वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला, याचा सखोल तपास सध्या बारामती पोलीस करीत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांचा तीव्र संताप: या गंभीर घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या गृहखात्यावर आणि कायदा-सुव्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या सोशल मीडिया संदेशात सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, "बारामतीसारख्या महत्त्वाच्या शहरात आणि विमानतळ परिसरासारख्या ठिकाणी अशा प्रकारे उद्योजकावर सत्तूरने व जीवघेणा हल्ला होणे अत्यंत चिंताजनक आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा व कायद्याचा अजिबात धाक उरलेला नाही. गुन्हेगार सहजासहजी असे हल्ले करून पसार होतात आणि गृहखात्याची यंत्रणा केवळ बघत राहते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची धंद्या उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन हल्लेखोरांना जेरबंद करावे."
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




