
Mumbai : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारमधील माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.१९९५ मधील सदनिका लाटल्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर कोकोटे यांनी आज बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे.
सदनिका लाटल्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर कोर्टाने त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं आहे. त्यांना नाशिक पोलिसांकडून कधीही अटक होण्याची शक्यता आहे. अटक होऊ नये, यासाठी कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली. परंतु कोकाटे यांना आज कोर्टाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.
|
|
कोकाटे यांची आज तब्येत बिघडली असून त्यांना लिलावती रुग्णालयातही दाखल करण्यात आलं आहे. दुसरीकडे सदनिका लाटल्या प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कोकाटे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, कोर्टाच्या निर्णयाआधीच कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीत कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून हायकोर्टात शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणामुळे कोकाटे यांचं मंत्रिपदासह आमदारकीवरही गदा येणार असल्याचे सांगितलं जात आहे. कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता क्रीडामंत्रिपदाचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९९५ कायद्यानुसार, एखादा लोक प्रतिनिधी कोर्टात दोषी सिद्ध झाला. तर या कायद्यानुसार तो मंत्रिपदावर राहू शकत नाही. कारण दोन वर्षांहून अधिक शिक्षा झाल्यास त्या प्रतिनिधीला अपात्र घोषित केले जाते. या प्रकरणात त्याला शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कोर्टाने त्या प्रतिनिधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतरच त्याची आमदारकी राहू शकते.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

