
Municipal Corporation Election Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही. त्यामुळेच आयोगाला ठरलेल्या निवडणूक कार्यक्रम आता बदलावा लागणार आहे. जिल्हा परिषदा निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार, आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका संपवायच्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आलेली आहे.
निवडणुकीतील आरक्षणाच्या घोळामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचे पालन झालेले नाही, त्यामुळे या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील फक्त दोन महापालिकात आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. या निवडणुका डिसेंबरमध्येच होऊ शकतात.
|
Pune : पुणे हादरलं! पीएमपीची वाट पाहत असलेल्या शाळकरी मुलावर अचानक हल्ला; धारदार शस्त्राने हात कापला |
नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकेत राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १७ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोला सुनावले. निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली, तिथे निवडणुका घेता येणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे १७ जिल्हा परिषदा मागे ठेवून फक्त १५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे आता आयोगाकडून आधी महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पण त्यासाठीही आयोगाला १० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. १० डिसेंबर रोजी महापालिकांची वार्डनिहाय मतदार यादी फायनल होईल. त्याचा आढावा आयोगाकडून घेतला जाईल. त्यानंतर तीन ते चार दिवसानंतर राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत महापालिका निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते.
नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. पण त्याआधीच राज्यात महापालिका निवडणुका लागतील, असा अंदाज वर्तवला जातोय. जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका घेण्यासाठी आयोगाकडे फक्त ५० ते ५२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात त्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ महापालिका निवडणुका १५ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत या कालावधीत होतील. तर झेडपी, पंचायत समित्याच्या निवडणुका ५ ते ३१ जानेवारी या वेळात होऊ शकतात.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




