Pune : महापालिका निवडणुकीला हिरवा कंदील; डिसेंबरमध्ये लागू आचारसंहिता, या आठवड्यात मतदानाची तयारी

Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता डिसेंबरच्या मध्यावधीत आचारसंहिता जाहीर होऊन जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुकांनी आनंद व्यक्त केला आहे. महापालिकेने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारंभी प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रारूप मतदार यादीही जाहीर केली. तसेच, हरकती-सूचना घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Pune : सोलापूर महामार्गावरील मोठी मोहीम; हजारो चौ.फुट अवैध बांधकामांविरुद्ध प्रशासनाची धडक कारवाई

महापालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता १५ डिसेंबरदरम्यान लागू होण्याची शक्यता आहे, तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेने ५० टक्के आरक्षणाच्या मयदिचे पालन केलेले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी कोणतीही अडचण नाही.

- प्रसाद काटकर, उपायुक्त, निवडणूक विभाग, पुणे महापालिका



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *