Uddhav Thackeray : हिंदी सक्तीचे जीआर रद्द, आता ५ जुलैला मोर्चा होणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray : हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीचे दोन शासन रद्द केले आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर मनसेच्या कार्यकत्यांनी जल्लोष केला. तर संजय राऊत यांनी ५ जुलै रोजीचा मोर्चा निघणार नसल्याचे सांगितलं. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'आता 5 जुलैला मोर्चा नसेल. पण जल्लोष किंवा विजयी सभा होणार असल्याचे उद्ध ठाकरे यांनी सांगितले.

फडणवीस सरकारच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'हिंदी सक्ती विरोधात आज राज्यभर आंदोलन केले. जीआरची होळी केली. मराठी भाषा कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालो. सक्तीपेक्षा शक्ती भारी पडली. सगळेजण पक्ष भेद विसरून एकत्र झाले. सरकारचा डाव उधळून लावला. राज्यातील सरकारने मराठी माणसाची एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला. मराठी अमराठी वाद करून अमराठी मते घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मराठी माणसांमध्ये फूट फाडण्याचा प्रयत्न केला'.

'5 तारखेचा मोर्चा होऊ नये म्हणून जीआर रद्द केला. मराठी माणूस एक होऊ द्यायचच्या नाही. समितीला आता अर्थ नाही. सक्ती होऊ देणार नाही. समिती कुणाची नाही. भाजप खोट्याची फॅक्टरी आहे. अफवाची फॅक्टरी एक चित्रपट काढावा. मुख्यमंत्र्यांना मराठी कळत नसल्याने मी मराठी सक्तीची केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले त्यावर मी रघुनाथ माशेलकर समिती नेमली. अहवाल सादर झाल्यावर एक अभ्यास गट नेमला गेला. त्यानंतर सरकार पाडलं, असे ठाकरे पुढे म्हणाले.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *