बीड: केज शहरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. केज शहरातील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका माजी सैनिकाच्या बंद घराचे आणि किराणा दुकानाचे कुलूप तोडून तब्बल ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या ४८ तासांत यशस्वी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, हा घरफोडी करणारा अन्य कोणी नसून अगदी त्याच गल्लीतील राहणारा तरुण निघाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, केज येथील फुलेनगर भागात माजी सैनिक दिनकर देविदास विडेकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या घराचे तसेच घराला लागून असलेल्या किराणा दुकानाचे चॅनेल गेट आणि मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता.
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी बीडवरून स्थानिक गुन्हे शाखा (LCB), श्वानपथक तसेच विशेष ठसेतज्ज्ञांना (Fingerprint Experts) घटनास्थळी तातडीने पाचारण केले. घटनास्थळावरून ठसेतज्ज्ञांनी अत्यंत बारकाईने पुरावे गोळा करत आरोपीच्या बोटांचे ठसे हस्तगत केले आणि त्यावरून संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, समांतर तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी फुलेनगर परिसराचाच निवासी असलेला ऋषिकेश दिलीप काळे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्दामीलापैकी ३ लाख ५५ हजार रुपयांची रोकड व दागिन्यांचा ऐवज यशस्वीरित्या जप्त केला आहे. या अत्यंत वेगाने आणि धडाडीने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
























Subscribe to my channel



