
Pune : स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर बदल करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. या भागातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात २०० ते ३०० कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज असे मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे.
या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. या विस्तारीकरणाच्या मेट्रो प्रकल्पात तीन मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार होती. मात्र लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या मार्गावर चौथे मेट्रो स्टेशन देखील आता उभारले जाणार आहे. बालाजीनगर येथे हे नवीन स्थानक उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला असून, यासाठी पुणे महापालिकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
या मेट्रो मार्गावर आता तीनऐवजी चार स्थानके होणार असल्याने बालाजीनगर, धनकवडी या परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नवीन स्थानक उभारताना त्याचा आर्थिक भार महापालिका घेणार नाही, या अटीवर ही परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन स्थानकाचा खर्च महामेट्रोला करावा लागणार आहे.
स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये (डीपीआर) मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. पद्मावतीनंतर थेट कात्रजला मेट्रोचे स्थानक असल्याने धनकवडी, बालाजीनगर परिसरातील प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता होती. बालाजीनगर भागात चौथे स्थानक उभारावे, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. तसेच काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन स्थानक उभारण्याचा ठरावदेखील करण्यात आला होता. या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रो स्थानकाची मागणी जोर धरत होती. नवीन स्थानक करायचे झाल्यास त्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव महत्त्वाचा असतो. मात्र, यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाला अनेक वर्षे झाल्याने महामेट्रोने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे नवीन ठराव करून देण्याची विनंती केली होती.
बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास प्रशासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. नवीन स्थानक उभारताना त्याचा कोणताही आर्थिक भार महापालिकेवर असणार नाही, अशी अटदेखील यामध्ये घालण्यात आली आहे. स्थानकासाठी आवश्यक ती जागा महापालिका देणार असून, उभारणीचा संपूर्ण खर्च महामेट्रो करणार आहे.
या भागातील लोकप्रतिनिधी, तसेच प्रवाशांची स्टेशनसाठी होत असलेली मागणी विचारात घेत महामेट्रोने येथे पाहणी केली. मेट्रोच्या दोन स्थानकांमधील अंतर एक ते दीड किलोमीटरपेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र, या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० इतके आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेत बालाजीनगर येथे नवीन स्थानक उभारण्याची तयारी मेट्रोने दाखविली असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वारगेट-कात्रज विस्तारित मार्गाची वैशिष्ट्ये
५.४६३ किलोमीटर लांबीचा मार्ग
विस्तारित मेट्रोच्या प्रकल्प खर्चासाठी २९५४.५३ कोटी रुपयांना मान्यता
पुणे महापालिकेचा हिस्सा १८१.२१ कोटी रुपये
दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानकातील अंतर १.९ किलोमीटर
धनकवडी, बालाजीनगर, के. के. मार्केट परिसरातील प्रवाशांना सोयीस्कर
नवीन स्थानकाच्या समावेशामुळे प्रकल्प खर्च २०० ते ३०० कोटींनी वाढण्याची शक्यता
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



