ठाणे: गाजलेल्या प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांवर आरोप केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील दोषी कितीही प्रभावशाली असला तरी त्याची अजिबात गय केली जाणार नाही आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे. तसेच, या दुर्दैवी हत्येच्या मुद्द्यावर विरोधकांनी कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीबाबत आणि पूर्णेकर कुटुंबाशी जवळीक: ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार नरेश म्हस्के यांना पूर्णेकर हत्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सर्व मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. माजी ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांचा समाचार घेताना म्हस्के म्हणाले की, "मीनाक्षी शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे. जर कोणाला शंका असेल तर त्यांनी चौकशी करावी, त्या पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत."
पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, पूर्णेकर कुटुंब आणि आमचे संबंध अत्यंत जुने व जिव्हाळ्याचे आहेत. जयनाथ पूर्णेकर हे आमचे मित्र असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी स्वतः किंवा इतर शिवसैनिकांचे त्या कुटुंबाशी प्रेमाचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एका सामाजिक कार्यकर्त्याची झालेली ही हत्या अत्यंत वेदनादायी असून, यात जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दोषी असेल, त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
विरोधी पक्षांच्या राजकारणावर कडक ताशेरे: या प्रकरणावरून विरोधक आणि विशेषतः उद्धव सेनेच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या राजकीय टीकेवर ताशेरे ओढत खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "दुर्दैवी घटनांवर आणि मृत्यूवर राजकारण करण्याची विरोधकांची जुनी सवय आहे. ठाण्यातील पराभवाच्या नैराश्यातून आणि राजकीय दुषित मानसिकतेतून प्रत्येक घटनेचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्णेकर कुटुंबीयांबद्दल खरोखरच प्रेम असेल, तर या घटनेचे भांडवल करून वातावरण दूषित करण्याऐवजी पोलिसांना निष्पक्ष तपास करू द्यावा."
तपास पूर्ण होण्याआधीच विविध प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोप करून या गंभीर प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे प्रकार थांबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सत्य लवकरच बाहेर येईल आणि दोषींना कठोर शासन होईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- पुणे: एमपीएससी आंदोलन लांबले तर मी स्वतः येईन...; नाना पाटेकरांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलेला शब्द; रोहित पवारांनी सांगितली अखेरची आठवण!
- नवी मुंबई: कांद्याने आणले डोळ्यात पाणी; घटलेले उत्पादन आणि माथाडी कामगारांच्या निर्णयाचा फटका, किरकोळ बाजारात दर ८० रुपयांवर!
महाराष्ट्र
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- पुणे: एमपीएससी आंदोलन लांबले तर मी स्वतः येईन...; नाना पाटेकरांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलेला शब्द; रोहित पवारांनी सांगितली अखेरची आठवण!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप























Subscribe to my channel




