छत्रपती संभाजीनगर: एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध इंग्रजी शिक्षक आणि 'फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासेस'चे संचालक मोहन शिवराम कोरडे (वय ६०) यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्याच क्लासरूममध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. आर्थिक फसवणूक, न्याय मिळवण्यासाठीचा लांबलेला लढा आणि डोक्यावर आलेली बँकेच्या जप्तीची नोटीस यामुळे ते अत्यंत नैराश्यात होते, ज्यातून त्यांनी हे दुर्दैवी पाऊल उचलले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह शैक्षणिक वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना कशी घडली? मोहन कोरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-१ परिसरीत 'फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासेस' चालवत होते. या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सुधारून त्यांचे भविष्य घडवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोहन कोरडे यांनी त्यांच्या याच क्लासरूममध्ये एका आंदोलनाच्या बॅनरवर बसून विषारी पदार्थ प्राशन केला. विशेष म्हणजे, विष प्राशन केल्यानंतर त्यांनी स्वतःच पोलिसांना फोन करून याबद्दलची माहिती दिली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुर्दैवाने बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
फसवणूक आणि कर्जबाजारीपणाचा विळखा: पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि मोहन कोरडे यांनी मागे ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये (चिट्ठीत) लिहिल्या अनुसार, ते गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक व मानसिक विवंचनेत होते. त्यांनी आपल्या चिृट्टीत नमूद केले होते की, २००६ मध्ये त्यांनी सिडको एन-१ मधील टपाडिया सिने मार्केटमधील काही दुकानांसाठी ७.५ लाख रुपये दिले होते, मात्र त्यांना ती मालमत्ता हस्तांतरित करण्यात आली नाही आणि त्यांच्यासोबत कागदपत्रांमध्ये फसवणूक करण्यात आली. याशिवाय, एका ५० लाखांच्या कर्जाच्या वादात काही जणांनी त्यांचे कोरे चेक व बाँडपेपर घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही आणि नंतर ते चेक इतरांना दिले, असा आरोप त्यांनी केला.
या सर्व कायदेशीर वादांमुळे आणि फसवणुकीमुळे त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. त्यातच बँकेकडून त्यांच्यावर १६.५ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली होती आणि ६ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ता जप्त करून तिचे लिलाव करण्याची कारवाई चेतावनी देण्यात आली होती. डोक्यावर बँकेची जप्ती आल्याने आणि प्रशासनाकडून व पोलिसांकडून योग्य न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून त्यांनी आयुष्य संपवण्याचा हा मार्ग निवडला.
तीन पानांची सुसाईड नोट आणि गंभीर आरोप: मोहन कोरडे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ३ पानांच्या चिठ्ठीत असा दावा केला आहे की, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी २००६ ते २०२५ या कालावधीत ५० पेक्षा जास्त अर्ज दिले होते. एवढेच नव्हे तर मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी उपोषणेही केली होती. २०१० मधील एका बनावट बाँड प्रकरणातील फाईल गायब झाल्याचा आणि पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी संबंधितांना मदत केल्याचा गंभीर आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बेंगळुरू येथे कायद्याचे उच्च शिक्षण घेत असलेला एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- पुणे: एमपीएससी आंदोलन लांबले तर मी स्वतः येईन...; नाना पाटेकरांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलेला शब्द; रोहित पवारांनी सांगितली अखेरची आठवण!
- नवी मुंबई: कांद्याने आणले डोळ्यात पाणी; घटलेले उत्पादन आणि माथाडी कामगारांच्या निर्णयाचा फटका, किरकोळ बाजारात दर ८० रुपयांवर!
महाराष्ट्र
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- पुणे: एमपीएससी आंदोलन लांबले तर मी स्वतः येईन...; नाना पाटेकरांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलेला शब्द; रोहित पवारांनी सांगितली अखेरची आठवण!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!























Subscribe to my channel




