नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी तस्करीशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला आहे. परप्रांतांतून लहान मुलांना नागपुरात आणून त्यांना लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या हवाली केले जात असल्याचे आणि तेथून त्यांना वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती तसेच राज्यातील व देशातील इतर विविध प्रांतांमध्ये व शहरांमध्ये बालमजुरीसाठी पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. बाल सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असणाऱ्या या प्रकरणात नागपूर प्रशासनाने कडक कारवाई करत यंदाच्या वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत (जानेवारी ते ऑगस्ट) तब्बल ४५ बालमजुरांना बाल कामगार व संरक्षण पथकाकडून यशस्वीपणे ताब्यात घेत त्यांची सुटका केली आहे.
तपास यंत्रणांनी उघड केलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम यांसारख्या विविध राज्यांमधून तस्करांद्वारे अल्पवयीन मुलांना फूस लावून किंवा आर्थिक अमिषापोटी नागपुरात आणले जाते. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे या मुलांचा ट्रान्झिट पॉईंट म्हणून वापर केला जातो. येथील स्थानिक दलालांच्या माध्यमातून या मुलांना धोक्याच्या कारखान्यांमध्ये, विटाभट्ट्यांवर, लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांवर कामासाठी पाठवले जाते.
नागपूर शहरात प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या विविध मोहिमांमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमध्ये धोकादायक यंत्रसामग्रीवर बालकांकडून काम करून घेतले जात असल्याचे उघडकीस आले होते. तसेच, ताजबाग परिसर, वाडी येथील लॉजिस्टिक कंपन्या, आणि गांधीबाग-तहसील परिसरातील कपड्यांच्या कारखान्यांमध्ये छापा टाकला असता, तिथे अनेक परप्रांतीय अल्पवयीन मुले अत्यंत अयोग्य आणि धोकादायक परिस्थितीत काम करताना आढळली होती. यातील काही प्रकरणांमध्ये मुलांना कामगार म्हणून राबवून घेतल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी त्यांना मदरशात शिक्षणासाठी आणल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्नही दलालांकडून करण्यात आला होता. या संपूर्ण बालमजुरी आणि तस्करीच्या जाळ्यामागील मुख्य सूत्रधारांचा व दलालांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि कामगार आयुक्तालय संयुक्तपणे कठोर मोहीम राबवत असून, बालकांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी नेटवर्कवर कायदेशीर बडगा उगारला जात आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



