
Dharashiva : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला तर एक मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहे. त्यामुळे आघाडीत मोठ्या पवारांच्या तुतारीला धाराशिव जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात अधिकृत स्थान मिळालेले नाही. उमेदवाराच्या नावात बदल झाल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम शिवसेनेने दूर केला आहे. परंड्यात मशाल चिन्हावर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील लढणार आहेत. तर माजी आमदार राहुल मोटे यांनी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह शुक्रवारी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे परंड्यात आघाडीत बिघाडी होणार का? हे पहावे लागणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीला एकाही मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. चारपैकी तुळजापुरात भाजपाचे कमळ विजयी झाले. तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाला मतदारांनी विजयी कौल दिला. भूम-परंडा-वाशी, धाराशिव-कळंब आणि उमरगा-लोहारा या तीन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे प्रा. डॉ. तानाजी सावंत, कैलास पाटील आणि ज्ञानराज चौगुले विजयी झाले. गुवाहाटीमार्गे झालेल्या सत्ता स्थापनेच्या प्रयोगात भूम-परंडा-वाशी आणि उमरगा-लोहारा येथून धनुष्यबाणावर निवडून आलेले दोन्ही आमदार शिंदे सेनेत दाखल झाले. त्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघात सावंत यांच्या या भूमिकेमुळे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी ठाकरेसेनेत राहणेच पसंत केले. सावंत यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघातून पुन्हा एकदा लढण्यासाठी राहुल मोटे तयारीला लागले होते.
|
MVA News : महाविकास आघाडीत पहिली ठिणगी? ‘हा’ पक्ष वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? |
मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंसोबत झालेली गद्दारी गाढून टाकता येईल, असे सांगत रणजित पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठली. मातोश्रीवरून रणजित पाटील यांच्या नावावर मोहोर उमटविण्यात आली. मात्र दुसर्या दिवशी शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत रणजित पाटील यांचे नाव नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर कोणीही प्रतिक्रिया देवू नका. संयम राखा, असे आवाहन करीत राहुल मोटे यांनी आपण उमेदवार असल्याचे सूचक संकेत दिले होते. झालेली चूक दुरूस्त करत शिवसेनेने उमेदवार म्हणून रणजित पाटील यांची गुरूवारी अधिकृत घोषणा केली. तर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे इच्छूक उमेदवार राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यासठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेचे शिलेदार तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे परंडा मतदारसंघात मोठा संशय कल्लोळ उसळला आहे. ही आघाडीत बिघाडी तर नाही ना? अशी चर्चा जोर धरू लगली आहे. ठाकरेंची मशाल आणि मोठ्या पवारांची तुतारी एकमेकांच्या विरोधात षड्डू ठोकणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

