
मुंबई (दहिसर):
मुंबईतील दहिसर परिसरात आज मनसे (MNS) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्याला मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.
नेमका वाद काय?
राज्य सरकारने १ मे (महाराष्ट्र दिन) पासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे सक्तीचे केले आहे. या निर्णयाला शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला असून, रिक्षाचालकांमधील भीती दूर करण्यासाठी त्यांनी दहिसरमध्ये एका मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, "मुंबईत राहायचे असेल तर मराठी बोलणे सक्तीचेच हवे," अशी भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला.
गाडीच्या टायरची हवा काढली:
संजय निरुपम कार्यक्रमस्थळी पोहोचताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निरुपम यांच्या गाडीला घेराव घातला आणि त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दहिसर लिंक रोडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडीही झाली.
संजय निरुपम यांची भूमिका:
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, "मी या निर्णयाबाबत संबंधित मंत्र्यांशी बोललो आहे आणि त्यांना पुनर्विचार करण्याचे पत्रही दिले आहे. सरकार तुमच्याबद्दल संवेदनशील आहे, त्यामुळे रिक्षाचालकांनी घाबरून जाऊ नये."
मनसेचे प्रत्युत्तर:
मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. "गेल्या २५ वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवणाऱ्यांना मराठी का येत नाही? उत्तर भारतीय रिक्षाचालक स्वतःहून मराठी बोलण्यास तयार असताना निरुपम त्यांना भडकवण्याचे काम का करत आहेत?" असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, काही आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel



https://shorturl.fm/HkBzV