Andhra Pradesh : विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये छुपे कॅमरे; शंभरहून अधिक व्हिडिओंची विक्री, कॉलेजच्या हॉस्टेलमधील संतापजनक प्रकार

New Delhi : कोलकाता आणि बदलापूरमधील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेक जण महिला सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत आहेत. याचदरम्यान आंध्रप्रदेशच्या विजयवाडातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्रप्रदेशातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच कॉलेजबाहेर संताप व्यक्त केला.

आंध्र प्रदेशच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे बी. टेकच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याने आणखी एका विद्यार्थ्याच्या मदतीने छुपे कॅमेऱ्याने व्हिडिओ काढल्याचा आरोप संतापलेल्या विद्यार्थ्यांचा आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत.

Chandrapur Crime : धावत्या बसमध्ये शाळकरी मुलींचा विनयभंग, चंद्रपुरातील संतापजनक घटना, स्टेशन मास्तरला अटक

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या आवारात या धक्कादायक प्रकाराच्या विरोधात आंदोलन पुकारलं. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे टॉर्च सुरु करून 'आम्हाला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्याचे नाव विजय असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉस्टेलमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. हॉस्टेलच्या आवारात मध्य रात्री ३.३० वाजेपर्यंत परिसरात तणावाचं वातावरण होतं.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Andhra Pradesh : विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये छुपे कॅमरे; शंभरहून अधिक व्हिडिओंची विक्री, कॉलेजच्या हॉस्टेलमधील संतापजनक प्रकार”

  1. Undeniably believe that whhich you said. Yourr favorite justjfication appeared to be
    oon thhe nnet the simplest thing too be aware of. I ssay
    to you, I certainly get annoyed while peole think about worries
    that thhey plainpy do nnot know about. You managed to hit thee nail upon the top
    ass well as defined out the whole thing without havikng sid effwct , peopke could take a signal.
    Will probably be back to gget more. Thanks xnxx

    Allso visit my site weeb psge (Lillie)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *