Arnala Beach : अर्नाळा समुद्रात अल्पवयीन जोडप्याने मारली उडी; धक्कादायक घटनेनं विरारमध्ये खळबळ

Arnala Beach : अर्नाळा समु्द्रात अल्पवयीन जोडप्याने उडी मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. एका स्थानिक व्यक्तीने मुलीला वाचवण्यात यश मिळवले. मात्र, अल्पवयीन मुलगा बुडाला असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात उडी घेणारे मुलगा आणि मुलगी दोन्ही १७ वर्षीय आहेत.ते विरार पश्चिमेतील  रहिवासी असल्याचं कळतंय. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघेही तीन दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेले होते.

Bhandara Heavy Rain : भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, राज्य मार्गावरही साचले पावसाचे पाणी

कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला शोधून काढले. त्यांचा जबाब नोंदवून पालकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक हे जोडपे कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रकिनारी गेले. तेथे दोघांनीही एकमेकांचे हात हातात धरून समुद्रात उडी मारली.

दरम्यान, स्थानिकांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ समुद्रात उड्या घेतल्या. यावेळी अल्पवयीन मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र, खोल पाण्यात गेल्याने मुलगा बुडाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुलाचा शोध घेणे सुरू होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *