ठाणे शहरात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना ८ दिवसांसाठी निलंबित (सस्पेंड) करण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाईचे नेमके कारण: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना, आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी प्रत्येक ठिकाणी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते. मात्र, अनेक दुर्घटनांच्या ठिकाणी यासीन तडवी हे उपस्थित नव्हते, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री स्वतः पाहणीसाठी आले असतानाही तडवी हे कार्यालयात अनुपस्थित होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी ही निलंबनाची कारवाई केली.
शिंदेंनी दिला प्रशासनाला इशारा: आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला. ते म्हणाले, "आपत्तीच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही." या घटनेनंतर, ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आऊटसोर्सिंगद्वारे तातडीने मनुष्यबळ भरती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनासाठी सक्त सूचना: उपमुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहरात पाणी साचलेल्या ठिकाणांहून पाण्याचा निचरा करणे आणि झाडे पडल्यास ती तातडीने बाजूला करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने निष्काळजीपणा दाखवल्यास थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- पुणे: अशा घटना खपवून घेणार नाही; शिवाजीनगर कोर्टातील मंदार किवळे हल्ल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, पोलीस महासंचालकांना खडसावले!
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
- सातारा: शेतीकडे केवळ व्यवसाय नव्हे, उद्योजकतेची संधी म्हणून पाहा; कराडच्या कृषी महोत्सवात सुनेत्रा पवार यांचे तरुणाईला आवाहन!
- पुणे: लाल सिग्नल असतानाही बस पुढे नेणे, अचानक लेन बदलणे; पुण्यात बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना हरताळ!
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
गुन्हा
- पुणे: पोलिसांची मोठी धडक कारवाई! शिरूरमध्ये २५० किलो गांजा जप्त; १.५१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक!
- नागपुर: सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलात १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्राला मारहाण करून पळवले, नागपूर हादरले!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार; जखमी मंदार किवळेचा थरारक पहिला जबाब समोर!
- अमरावती: इर्विन रुग्णालय परिसरात कापलेले दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने खळबळ!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel




