
Wardha News : वर्धा जिल्हा दारूबंदी असतानाही लगतच्या जिल्ह्यातील काही बारमालक, वाईन शॉप मालक बिनधास्तपणे जिल्ह्यात दारूचा पुरवठा करीत आहेत. मात्र आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस ऍक्शन मोडवर आले असून आता वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणाऱ्या बार मालकाचे थेट बार आणि वाईन शॉप परवाना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया वर्धा पोलिसांनी सुरू केली आहे.
जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून जिल्ह्याची ओळख संपूर्ण जगात आहे. १९७४ मध्ये वर्धा जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत ही दारूबंदी केवळ फोल ठरल्याचेच सर्वसामान्यांनी अनुभवले आहे. जिल्ह्यात पूर्णतः दारूबंदी होण्यासाठी अनेक तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी विविध उपाययोजना राबविल्या. मात्र, त्यांना हवे तसे यश आले नाही. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारताच सर्वांत पहिले दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या धडक कारवाईमुळे दारू विक्रेते सैरभैर झाले. अनेकांनी जिल्हा सोडून पळ काढला. जवळपास शंभरावर दारू विक्रेत्यांना तडीपार केले.
|
Pachora Crime News : एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडल्या; पाचोऱ्यातील घटना |
आता परवाने रद्दची कारवाई
जिल्ह्यालगत जवळपास शंभरावर बार आणि वाईन शॉप आहेत. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याचे माहिती असतानाही काही बार आणि वाईन शॉपमालक परवान्याचे उल्लंघन करून दारू पुरवतात. अशा बारमालकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ८२ अन्वये गुन्हा होतो. ज्या बारमालकांवर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशांचा बार परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

