
Pune : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) वर्तुळाकार रस्त्याची (रिंग रोड) आखणी करताना त्यांच्याच बांधकाम खात्याने दिलेल्या परवानगीचा विसर पडला आहे. बांधकाम परवानगी दिलेल्या जागेवरच रिंग रोडचा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. जोते तपासणी (प्लिंथ तपासणी), पूर्णत्वाचा दाखला किंवा हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर), चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यासाठी अर्ज केल्यावर नागरिकांना ‘तुमची इमारत रिंग रोडमध्ये बाधित होत आहे,’ असा खुलासा ‘पीएमआरडीए’ने केला. यामुळे शेतकरी, छोटे भूखंडधारक हवालदिल झाले आहेत.
परस्पर प्रस्ताव सरकारकडे
‘पीएमआरडीए’ने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंग रोड विकसित करण्याचा निर्णय घेतला; तो ६५ मीटर रुंदीचा आहे. यानुसार रिंग रोड जाणाऱ्या भागातील नागरिकांना बांधकाम परवानगीचे नकाशे आखून दिले; ते मंजूर झाले. ‘पीएमआरडीए’च्या अभियांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाशी चर्चा न करता रिंग रोडचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे पाठविला.
'तुमच्या इमरातीवर जंक्शन आहे'
या प्रस्तावात काही ठिकाणी मोठे लिफ्ट आणि काही ठिकाणी जंक्शन प्रस्तावित केले आहेत. मात्र, हे बदल कुठेही अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या प्रकल्पांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. पीएमआरडीएच्या वेबसाइटवरील रिंग रोडचा नकाशा आणि झोनिंगचा नकाशा यात तफावत आहे. नागरिकांना प्लॅन अद्ययावत करण्यासाठी नव्याने झोनिंग करून घेण्यास सांगितले जात आहे. याचवेळी, ‘तुमच्या इमारतीवर रिंग रोडचे जंक्शन आले आहे,’ असे पीएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक जण अडचणीत सापडले आहेत.
सुधीर कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, ‘रिंग रोडच्या आखणीत केलेला बदल वेबसाइटवर टाकलेला नसताना सन २०२३मध्ये ‘सोशल इम्पॅक्ट ॲसेसमेंट’ (एसआयए) करताना नागरिकांची फसवणूक करण्यात आली. आता संबंधित नागरिकांना प्लिंथ चेकिंग, कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा टीडीआर, एफएसआय द्यायची वेळ आल्यानंतर त्यांना तुमच्या इमारती बाधित होत आहेत. तुमच्या जागेवरून रिंग रोड जात आहे, असे सांगितले जात आहे. छोट्या भूखंडधारकांनी बांधकाम परवानगी घेऊन ‘रेरा’कडे नोंदणी करून सदनिका, गाळ्यांची विक्री केली आहे, त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न आहे. याची चौकशी झाली पाहिजे.’
नागरिकांचा गोंधळ
भूगाव रस्त्यावरील एका ‘रेरा’ नोंदणी प्रकल्पात चार वर्षांपूर्वी गाळा बुक केलेल्या श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, रिंग रोडची दिशा बदलल्याने प्रकल्पाचा ‘एफएसआय’ रद्द केल्याचे बिल्डरकडून सांगण्यात येत आहे. यामुळे त्यांचे पैसे अडकून पडले आहेत. ‘पीएमआरडीए’ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे माझ्यासारखे अनेक नागरिक विनाकारण भरडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एफएसआय म्हणजे ‘फ्लोर स्पेस इंडेक्स’. हा एक नियम आहे जो ठरवतो की एखाद्या जमिनीवर किती बांधकाम करता येईल. टीडीआर म्हणजे ‘ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स’. हे हक्क विकून बांधकाम व्यावसायिक अधिक बांधकाम करू शकतात.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.


























Subscribe to my channel



