Iran Milk Meat Bread Rates Hike: इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिकेने मोर्चा उघडला. तर इराण सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे. पण युद्धाचे ढग गडद झाल्यापासून इराणमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. गेल्या 10 वर्षात सर्वच अन्नपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामध्ये जवळपास 30 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये साप्ताहिक फूड बास्केटची किंमत 1.2 दशलक्ष रियाल होती. ती 2026 पर्यंत ती वाढून 36.6 दशलक्ष रियालवर पोहचली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वस्तूंचा साठा करायला सुरुवात केल्याने महागाईत तेल ओतल्या गेले आहे. 10 वर्षात किंमतीत मोठी उसळी बीबीसीच्या एका वृत्तानुसार, 2016 ते 2026 या दरम्यान फूड बॉस्केटच्या किंमतीत जवळपास 30 पटपर्यंत वाढ झाली. अवघ्या दहा वर्षांतील ही महागाई, तिथली दाहकता दर्शवते. 10 वर्षांपूर्वी ज्या वस्तू स्वस्तात मिळत होत्या. त्या आता अचानक महाग झाल्या आहेत. त्यासाठी नागरिकांना लाखो रियाल खर्च करावे लागत आहेत. याचा सर्वात मोठा फटका मध्यम आणि गरीब उत्पन्न गटाला मोठा फटका बसला आहे. त्यांना दैनंदिन घर खर्च चालवणे अवघड झाले आहे. दोन वेळच्या जेवणाची त्यांची भ्रांत आहे. 2021 नंतर महागाईत मोठी वाढ 2016 ते 2020 या दरम्यान किंमतीत इतकी मोठी वाढ झाली नव्हती. पण 2021 नंतर महागाई झपाट्याने वाढली. 2023 मध्ये फूड बास्केटसाठी 10.9 दशलक्ष रियाल खर्च आला. 2016 च्या तुलनेत जवळपास 9 पट्टीने हा भाव अधिक होता. बाजारात वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आणि अस्थिरता वाढू लागली. परिणामी किंमती वाढल्या. 1 किलो मटण — जवळपास 13–22 दशलक्ष रियाल 1 लिटर दूध — जवळपास 520,000 → 1.1 दशलक्ष रियालपर्यंत 1 बॉक्स पास्ता — जवळपास 340,000 → 570,000 रियालपर्यंत एक ब्रेड पॅकेट ~50,000 इराणी रियालपर्यंत 2025 ते 2026 दरम्यान मोठा झटका महागाईचा आगडोंब 2025 ते 2026 या दरम्यान नोंदवण्यात आला. या काळात किंमती 19.3 दशलक्ष रियालमधून वाढून 36.6 दशलक्ष रियाल इतक्या वाढल्या. म्हणजे एका वर्षात जवळपास दुप्पट वाढ झाली. 2026 मध्ये वार्षिक दरवाढ जवळपास 90 टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या या देशात महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. परिणामी सर्वसामान्य इराणी नागरीक हैराण झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

