हॉस्पिटल बांधण्यासाठी २५ लाख घेऊन ये!' शिरूरमध्ये डॉक्टर पत्नीचा छळ, भर पावसात फरफटत घराबाहेर हाकलले; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल!

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात स्वतःचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत एका डॉक्टर महिलेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांची मागणी पूर्ण न केल्याने पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करत भर पावसात रूममधून फरफटत घराबाहेर हाकलून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच राजकीय व प्रभावशाली व्यक्तींशी ओळख सांगून धमकावल्याचा आरोपही फिर्यादीने केला असून, या प्रकरणी डॉक्टर पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्या तिघांविरोधात गुन्हा आणि काय आहे फिर्याद:

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीकांत बबन वेताळ, नंदा बबन वेताळ आणि बबन वेताळ अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून, हे तिघेही शिरूरमधील बागवान नगर परिसरातील रहिवासी आहेत. तक्रारदार महिलादेखील डॉक्टर असून त्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नोकरी करत होत्या. त्यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मे २०२६ रोजी त्या मुंबईत असताना पती डॉ. श्रीकांत वेताळ याने शिरूरमध्ये हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. मात्र, पत्नीने या मागणीला नकार दिला.

पैसे न आणल्यास धमकी, भर पावसात बाहेर काढल्याचा आरोप व दबाव:

माहेरून पैसे आणले नाहीत, तर तुला सोडून देईन आणि माझे आई-वडील तुला घरात राहू देणार नाहीत, अशी धमकी पतीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही पैशाची मागणी मान्य न केल्याने संबंधित महिला डॉक्टरला मारहाण करून फरफटत भर पावसात खोलीतून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याशिवाय या घटनेची तक्रार केल्यास अजित पवार, सुनेत्रा पवार आणि दत्तामामा भरणे यांच्याशी ओळख असल्याचे सांगून कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही, अशी धमकी देत दबाव आणल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. शिरूर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *