
Mumbai Local News : मुंबईतील ठाणे येथे महिला प्रवाशाच्या लोकल डब्यात मोबाईलचा स्फोट झालाय. १० फेब्रुवारीला रात्री ८:१२ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शनपर्यंत लोकल ट्रेन जात होती. दरम्यान कळवा रेल्वे स्थानकावर महिलांच्या लोकल रेल्वे डब्यात एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला होता. घटनास्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी तातडीने दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली.
सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, 'सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मोबाईल फोनचा ब्लास्ट झाल्यामुळं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटामुळे महिला रेल्वे डब्यात धूर पसरला होता. धूर पाहताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच अग्रिशामक यंत्राचा वापर करून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आग विझवण्यात आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे पोलीस कर्माचाऱ्यांना यश मिळाले. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर रेल्वे डब्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
|
PMRDA : पुणेकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार! PMRDA च्या १३३७ घरांची लॉटरी आज निघणार |
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट घडला असल्याचा आवाज आला. स्फोटामुळे महिलांचा रेल्वे डबा धुराने भरला होता. ज्यामुळे रेल्वे डब्यातून उतरण्यासाठी प्रवासी दाराच्या दिशेने धावले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या महिलेचा मोबाईल फुटला त्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीची समस्या किंवा इतर काही तांत्रिक कारणांमुळे मोबाईल फोनचा ब्लास्ट झाला असावा. सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी दिलं.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




