भारतात गरिबी कमी होत आहे का? जागतिक बँकेचे तरहेच मानणे आहे. आपल्या ताज्या ‘पॉव्हर्टी अँड इक्विटीब्रीफ'' (गरीबी आणि समानता अहवाल) मध्ये या संस्थेनेसांगितले आहे की, गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्याभारतीयांची संख्या घटून 2.6% राहिली आहे. 2004 मध्ये53 कोटी भारतीय भीषण गरिबीत जीवन जगत होते. हेदेशाच्या एकूण लोकसंख्येच्या 46.4% होते. महागाईचाप्रभाव समायोजित करून गरिबी रेषेचे तेच निकष लागूकेल्यास 2023 मध्ये अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्याभारतीयांची संख्या केवळ 5.3 कोटीच राहिली होती. अशाप्रकारे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी- या दोघांच्याकार्यकाळाचा समावेश असणाऱ्या या 20 वर्षांत सुमारे 50कोटी भारतीय गरिबी रेषेच्या वर आले. जमिनी स्तरावर मिळणारे अनुभवजन्य पुरावे याआकलनाला पुष्टी देतीलच असे नाही. असे असूनहीजागतिक बँक म्हणते की, अत्यंत गरिबीत झालेली तीव्रघसरण आणि सुमारे 50 कोटी लोकांचे गरिबीच्या एकाउच्च उत्पन्न-निकषाच्या वर येणे हे आधुनिक युगातीलसर्वात उल्लेखनीय यशांपैकी एक आहे. भारताला ब्रिटिश राजवटीकडून एक डबघाईस आलेलीअर्थव्यवस्था वारशाने मिळाली होती. 1947 मध्ये देशातील80% पेक्षा जास्त लोकसंख्या अत्यंत गरीब होती. यानंतरहीसुधारणेची प्रक्रिया मंदच राहिली. 1977 पर्यंत अत्यंतगरिबीचा दर हळूहळू घटून 59.7% पर्यंत पोहोचला. 2004मध्येही हा 46.4% होता. वास्तविक सुधारणा 2011 नंतरसुरू झाल्या, जेव्हा अत्यंत गरिबीचा दर घटून 27.1%राहिला. यानंतर घसरणीचा वेग वाढला. 2022 पर्यंत अत्यंत गरिबीचा दर घटून 5.3% वर आला आणि 2023 मध्ये अर्धा होऊन 2.6% राहिला. परंतु सामान्य भारतीयांना अत्यंत गरिबीत झालेल्या या ऐतिहासिक घसरणीचा परिणाम जाणवत का नाही? याचेएक कारण असे आहे की, जागतिक बँकेने अत्यंत गरिबीची व्याख्या ठरवण्यासाठी खूप कमी उत्पन्न-मर्यादा निश्चितकेली आहे : दररोज 3 डॉलर. ही स्पष्टपणे स्वीकारार्ह मर्यादा नाही. जर ही उत्पन्न-मर्यादा वाढवून 4.2 डॉलर केली, तर गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्यांचे प्रमाण वाढून 16.1%होते. ही आकडेवारी भारतातील अत्यंत गरिबीच्या दरावर केलेल्या इतर अनेक अभ्यासांच्या व्याप्तीत येते, ज्यामध्येसुरेश तेंडुलकर समितीच्या अहवालाचाही समावेश आहे. जर अजूनही 16.1% किंवा 23 कोटी भारतीय घोर गरिबीत असतील, तर याचा अर्थ अजून ध्येय साध्य झालेले नाही.81% कुटुंबांना मिळत असलेले कल्याणकारी फायदे आणि मोफत रेशनने खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई आणि बेरोजगारीच्या दुहेरी माराशी लढण्यास मदत नक्कीच केली आहे.खरं सांगायचे तर भारतात तीन वेगवेगळे देश दिसूनयेतात. पहिला भारत उत्पन्नाच्या दृष्टीने अव्वल 10 टक्के भारतीयांचा आहे. हे सुमारे 15 कोटी संपन्न लोक आहेतआणि वेगाने वाढणाऱ्या उच्च-मध्यमवर्गाचा भाग आहेत.यांच्याकडे शेअर्स आहेत, हे वारंवार प्रवास करतात आणियांचे राहणीमान लॅटिन अमेरिकेतील मध्यम-उत्पन्नअसलेल्या देशांतील लोकांच्या राहणीमानाइतके आहे. दुसरा भारत मध्यभागी स्थित आहे. यामध्ये सुमारे 50 टक्केम्हणजेच 70 कोटी भारतीय येतात. यांच्याकडे मर्यादितसंसाधने आहेत, ते मोठे कर्ज घेतात आणि त्यांना सुरक्षित वचांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. यांच्यामध्येचांगल्या आयुष्याची आकांक्षा आहे आणि हे आर्थिकशिडीवर वर चढण्याच्या प्रयत्नात आहेत. तिसऱ्या श्रेणीतील अनेक लोक छोटे-मोठे काम-धंदेकरतात. यामध्ये एक मोठी लोकसंख्या लहानशेतकऱ्यांचीही आहे, ज्यांचे जीवन एका पिकापासून दुसऱ्यापिकापर्यंत कसेबसे चालते. जेव्हा मान्सून अपयशी ठरतो,जसे की या वर्षी भारताच्या काही भागांत झाले आहे, तेव्हात्यांना सावकारांकडून अवाजवी व्याजदराने कर्ज घ्यावेलागते. अशा व्याजाची परतफेड करण्याची उमेदही ते बाळगूशकत नाहीत. हेच कारण आहे की भारतात दरवर्षी 10,000पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात.गेल्या काही वर्षांतभारतासोबत हे दुर्दैव राहिले आहे की, त्याला अशा घटनांचाफटका सहन करावा लागला आहे, ज्यांच्यावर त्याचेकोणतेही नियंत्रण नव्हते. कोविड महामारीने भारताच्याआर्थिक विकास दराची दोन वर्षे हिरावून घेतली. इराणयुद्धाने व्यापारात अडथळा आणला आहे. अमेरिकनबाजारातून ऑर्डर्स मिळणे बंद झाल्यामुळे सुरतचे हिरेतराशणारे आणि पॉलिश करणारे कारागीर गरिबीच्याविळख्यात आले आहेत. क्रूडच्या किमतीतील वाढीमुळेखाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई वाढली आहे. एआय मुळेसुरुवातीच्या स्तरावरील अनेक नोकऱ्या अप्रस्तुत होतआहेत.परंतु अमेरिकेत ट्रम्प यांच्या पराभवानंतर वातावरणबदलले आहे. शेअर बाजारात तेजी आहे, रुपया मजबूतझाला आहे, तेलाच्या किमती घसरत आहेत आणि पुढीलमान्सूनमध्ये ला निनाच्या प्रभावाने चांगला पाऊस होण्याचीआशा आहे. भारतातील गरिबी कमी होण्याबाबत जागतिकबँकेचा आशावाद खरा ठरण्याची शक्यता आहे, कारणपरदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारताकडे वळत आहेत.वाढत्या अर्थव्यवस्थेचा फायदा देशातील या तिन्ही घटकांनावेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वेळी मिळत राहिलाआहे. आर्थिक विकासाचे फायदे हळूहळू खालच्याघटकांपर्यंत पोहोचले आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) योग्य दिशेने असलेला आशावाददेशातील गरिबी कमी होण्याबाबतजागतिक बँकेचा आशावाद खरा ठरूशकतो, कारण परदेशी गुंतवणूकदार पुन्हाएकदा देशाकडे वळत आहेत. वाढत्याअर्थव्यवस्थेचा फायदा देशातील तीनवेगवेगळ्या उत्पन्न-गटांना वेगवेगळ्याप्रकारे,वेगवेगळ्या वेळी मिळतच राहिला .आर्थिक विकासाचे फायदे हळू का होईनापण खालच्या घटकांपर्यंत पोहोचले आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




