डॉ. सामी महरुम यांचा कॉलम:जर एआयचे उपाय चुकीचे ठरले‎तर प्रश्न कोणाला विचारणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आता जेव्हा एआय स्वतःच गृहीतके (हायपोथिसिस)‎लिहीत आहे, प्रयोगांची रचना करत आहे आणि त्यांचे‎निष्कर्षही नोंदवत आहे, तेव्हा शास्त्रज्ञांनाही यानुसार‎स्वतःला ढाळून घ्यावे लागेल. ज्ञानाची विश्वासार्हता‎टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्रोत विश्वासार्ह असणे आणि‎ते जनतेला उत्तरदायी असणे आवश्यक असते. परंतु‎एआयची सध्याची क्षमता पाहता, आता संशोधन कोण‎करत आहे याला काहीच महत्त्व उरणार नाही का?‎ या प्रश्नाचे सोपे उत्तर हेच असेल की तथ्य हे तथ्यच‎असते, ते कोणी शोधले याने काय फरक पडतो. पण‎ज्ञानाचा प्रसार असा होत नाही. आपल्याला असे बहुतांश ‎‎वैज्ञानिक दावे भेटतात, ज्यांची पडताळणी करण्याचे मार्ग ‎‎आपल्याकडे नसतात. म्हणूनच आपण दाव्याऐवजी ‎‎त्यामागील व्यक्ती किंवा संस्थेच्या विश्वासार्हतेची पारख ‎‎करतो. हार्वर्डचे प्राध्यापक स्टीव्हन शेपीन म्हणतात की, ‎‎वैज्ञानिक सत्याची स्थापना ही नेहमीच आपल्या सहकारी ‎‎शास्त्रज्ञांना त्यावर विश्वास पटवून देण्याच्या सामाजिक ‎‎प्रक्रियेशी जोडलेली राहिली आहे.‎ विज्ञानातील प्रतिष्ठा केवळ विचारांवरून बनत नाही,‎तर ती संस्था, विभाग आणि प्रयोगशाळांमध्ये सामावलेली‎असते. या संस्थांची पत तिथून बाहेर येणाऱ्या‎संशोधनांनाही विश्वासार्हता देते. एखादी प्रतिष्ठित संस्था‎सोडून जाणारा शास्त्रज्ञ आपल्यासोबत त्या संस्थेच्या‎प्रतिष्ठेचा काही भाग घेऊन जातो. अनुकूल परिस्थितीत‎तो नवीन संस्थेलाही एका प्रतिष्ठित केंद्राच्या रूपात‎स्थापित करू शकतो.विश्वासार्हतेला अशा एखाद्या‎माध्यमाची गरज भासली आहे, ज्याद्वारे ती लोकांपर्यंत‎पोहोचेल. वेळेनुसार हे माध्यम बदलत गेले आहे आणि‎अनेकदा त्याला विरोधही झाला आहे. विश्वासार्हतेसाठी‎एखाद्या विद्वानाऐवजी प्रामाणिक संस्था, पीअर रिव्ह्यू,‎संशोधन मूल्यमापनाला महत्त्व मिळू लागले, तेव्हाही‎समीक्षकांनी आक्षेप घेतला होता. आता जेव्हा हे स्वामित्व‎मानवाकडून कडून यंत्रांकडे जाण्याची परिस्थिती निर्माण‎होत आहे, तेव्हा श्रेय, मौलिकता, गुणवत्तेच्या संदर्भात‎आक्षेप घेतले जाणारच. संशोधन चालवणाऱ्या‎व्यवस्थेतही बदल झाला आहे. हळूहळू या व्यवस्थेतील‎लक्ष एखाद्या संशोधनाचा निष्कर्ष किती समजला गेला‎आहे यावरून हटून, तो किती उपयुक्त आहे यावर केंद्रित‎होत गेले आहे. यंत्रांद्वारे तयार केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष‎आधीपासूनच अशा व्यवस्थेला अनुकूल आहेत, जी‎आकलनापेक्षा निष्कर्षांना जास्त महत्त्व देते.विरोधाभास‎असा आहे की, गेल्या दोन दशकांत डेटा खुला,‎शोधण्यायोग्य आणि मशीनद्वारे वाचता येण्याजोगा‎बनवण्याचे जे प्रयत्न झाले, त्यांचा उद्देश मानवी‎संशोधकांमधील सहकार्य सोपे करणे हा होता. पण याच‎प्रयत्नांनी तो पायाही तयार केला, ज्यावर आता स्वायत्त‎संशोधन (ऑटोनॉमस रिसर्च) काम करत आहे. गेल्या‎वर्षी अमेरिकेच्या इंटॉलॉजी या स्टार्टअपने विकसित‎केलेल्या ''जोची'' या एआय सिस्टमने लिहिलेल्या एका‎संशोधन पत्रिकेने असोसिएशन फॉर कम्प्युटेशनल‎लिंग्विस्टिक्सच्या वार्षिक बैठकीत पीयर रिव्ह्यूची प्रक्रिया‎पार केली. त्याचप्रमाणे, सॅन फ्रान्सिस्कोच्या‎''फ्युचरहाऊस'' या संस्थेच्या ''रॉबिन'' या एआय सिस्टमने‎गृहीतके तयार केली, प्रयोगांची रचना केली आणि‎निष्कर्षांचे विश्लेषण केले. आधीच मान्यता मिळालेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अशा एका औषधाची त्याने ओळख पटवली, जे‎अंधत्वाच्या एका प्रमुख कारणाच्या उपचारांमध्ये उपयुक्त‎ठरू शकते.ऑनलाइन प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये‎आधीच निम्मे लेख एआयद्वारे तयार होत आहेत. आता तर‎डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञसुद्धा हे सांगू शकत नाहीत की‎यातील मूळ किंवा खरे कोणते आहेत. अशा वेळी मानवी‎संवेदना आणि मूल्यांना महत्त्व देणारे लोक या गदारोळात‎आपले म्हणणे इतरांपर्यंत पोहोचवू शकतील का?समजा,‎एखाद्या एआय सिस्टमने नवीन लस विकसित केली.‎जनतेला कदाचित याने फरक पडणार नाही की हे काम‎कोणी केले. अगदी तसेच, जसे रुग्ण रक्ताची तपासणी‎कोणत्या तंत्रज्ञाने केली हे विचारत नाहीत. पण जर काही‎चुकीचे घडले, तर त्याबद्दल कोणाला जबाबदार धरावे, हे‎त्यांना जाणून घ्यायचे असेल. व्यक्तीला प्रश्न विचारले‎जाऊ शकतात, चूक सुधारता येऊ शकते, त्याला दावे‎मागे घेण्यास सांगितले जाऊ शकते; पण प्रश्न असा आहे‎की एखाद्या एआय मॉडेलसोबतही असे करता येईल का?‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ समजा एआयने एखादी नवीन लस‎विकसित केली. लोकांनी हे काम कोणी‎केले याने फरक पडणार नाही; जसे रुग्ण‎आपल्या रक्ताची तपासणी कोणत्या‎तंत्रज्ञाने केली हे विचारत नाहीत. पण जर‎काही चुकीचे घडले, तर जबाबदार कोण‎असेल?‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *