बलराज संघई यांचा कॉलम:हिरवा रंग : जीवन, चैतन्य, सौभाग्य आणि उत्साहाचे प्रतीक

हिंदू संस्कृती परंपरेतील शारदीय नवरात्र उत्सवात हिरवा रंग प्रामुख्याने माता कात्यायनी (षष्ठी/सहाव्या दिवशी) आणि काही पंचांग/परंपरेनुसार माता ब्रह्मचारिणी (दुसऱ्या दिवशी) किंवा स्कंदमाता यांच्याशी संबंधित मानला जातो. नवरात्रीमध्ये हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, चैतन्य, नवीन सुरुवात आणि मुख्य म्हणजे स्त्रीशक्तीचे (मातृशक्तीचे) प्रतीक मानला जातो. हिरवी साडी हिरवा चुडा हिरव्या बांगड्या हे सर्व स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक लेणं आदरानं मानलं जातं. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, जो शेती, हिरवळ आणि जीवनभराच्या वाढीचे व प्रजननक्षमतेचे प्रतीक ही मानला जातो. हिरवे झाड झुडप शेती पाहिल्यानंतर जो नैसर्गिक आनंद मनाला होतो तो कितीही पैसे खर्च करून होणाऱ्या आनंदाहून काही पटीने अधिक असतो. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग - प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे. मानसशास्त्रानुसार हिरवा रंग हा रंग मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समतोल देणारा मानला जातो. म्हणूनच घरातील एखाद्या भिंतीला हिरवा रंग अवश्य असावा. आणि गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, घराच्या आजूबाजूला शक्य तितकी हिरवी झाडं लावलेली असावी ज्याने मन शांत समाधानी आणि उत्साही राहते. सर्व हिरवी झाड मिळूनच आपल्याला प्राणवायू देतात म्हणूनच हिरव्या रंगापासून जीवनाची उत्पत्ती होते असे म्हणणे चुकीचे असणार नाही. शारदीय नवरात्र उत्सवात हा रंग परिधान केल्याने किंवा पूजेत वापरल्याने देवीची कृपा, उत्साह आणि चांगल्या भविष्याची आशा लाभते असे मानले जाते. चित्रकलेमध्ये हिरव्या रंगाची निर्मिती, पेंटिंग किंवा छपाईमध्ये हा पिवळा आणि निळा रंग एकत्र करून तयार होतो, तर कॉम्प्युटर किंवा टीव्हीच्या RGB मॉडेल्समध्ये तो हिरव्या प्रकाशाच्या माध्यमातून दिसतो. निसर्ग आणि आरोग्य: हिरवा रंग झाडे, पाने आणि निसर्गाचे प्रतीक आहे. हा आरोग्य, वाढ आणि चैतन्य दर्शवतो. जगाच्या पाठीवर नांदणाऱ्या अनेक संस्कृतींमध्ये हा रंग समृद्धी, संपत्ती आणि चांगल्या भाग्याचा संकेत असा ही मानला जातो. हा रंग मनाला शांतता देणारा आणि तणाव दूर करणारा असतो असे ही अनुभवाने म्हणले जाते. ट्रॅफिक सिग्नल किंवा इतर यंत्रणांमध्ये हिरवा रंग पुढे जाण्याची परवानगी किंवा 'यश' दर्शवतो. हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, बुद्धिप्रामण्यवादी, निरपेक्ष प्रेम करणारी असतात दुसऱ्याला आणि स्वतःला क्षमा करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. दुसऱ्याचे मन संभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. सकाळी फिरायला जाण्याचे महत्त्व देखील हिरवा रंग असलेल्या निसर्गाच्या सानिध्याशी अधिक आहे. सकाळी हिरवेगार वृक्ष, वेली पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. विश्रांती मिळते, मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. हिरव्या पालेभाज्या दररोजच्या आहारात नियमित खाण्यात असाव्यात हे तर उत्कृष्ट आरोग्यासाठी आवर्जून सांगितलं जातं.थोडक्यात सांगायचं झालं तर शारदीय नवरात्र उत्सवातील सहाव्या दिवशी विशिष्ट मान मिळालेला हिरवा रंग हा जीवनाचे, चैतन्याचे, सौभाग्याचे तसेच उत्साहाचे प्रतीक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *