हिंदू संस्कृती परंपरेतील शारदीय नवरात्र उत्सवात हिरवा रंग प्रामुख्याने माता कात्यायनी (षष्ठी/सहाव्या दिवशी) आणि काही पंचांग/परंपरेनुसार माता ब्रह्मचारिणी (दुसऱ्या दिवशी) किंवा स्कंदमाता यांच्याशी संबंधित मानला जातो. नवरात्रीमध्ये हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, चैतन्य, नवीन सुरुवात आणि मुख्य म्हणजे स्त्रीशक्तीचे (मातृशक्तीचे) प्रतीक मानला जातो. हिरवी साडी हिरवा चुडा हिरव्या बांगड्या हे सर्व स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक लेणं आदरानं मानलं जातं. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, जो शेती, हिरवळ आणि जीवनभराच्या वाढीचे व प्रजननक्षमतेचे प्रतीक ही मानला जातो. हिरवे झाड झुडप शेती पाहिल्यानंतर जो नैसर्गिक आनंद मनाला होतो तो कितीही पैसे खर्च करून होणाऱ्या आनंदाहून काही पटीने अधिक असतो. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग - प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे. मानसशास्त्रानुसार हिरवा रंग हा रंग मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक समतोल देणारा मानला जातो. म्हणूनच घरातील एखाद्या भिंतीला हिरवा रंग अवश्य असावा. आणि गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, घराच्या आजूबाजूला शक्य तितकी हिरवी झाडं लावलेली असावी ज्याने मन शांत समाधानी आणि उत्साही राहते. सर्व हिरवी झाड मिळूनच आपल्याला प्राणवायू देतात म्हणूनच हिरव्या रंगापासून जीवनाची उत्पत्ती होते असे म्हणणे चुकीचे असणार नाही. शारदीय नवरात्र उत्सवात हा रंग परिधान केल्याने किंवा पूजेत वापरल्याने देवीची कृपा, उत्साह आणि चांगल्या भविष्याची आशा लाभते असे मानले जाते. चित्रकलेमध्ये हिरव्या रंगाची निर्मिती, पेंटिंग किंवा छपाईमध्ये हा पिवळा आणि निळा रंग एकत्र करून तयार होतो, तर कॉम्प्युटर किंवा टीव्हीच्या RGB मॉडेल्समध्ये तो हिरव्या प्रकाशाच्या
माध्यमातून दिसतो. निसर्ग आणि आरोग्य: हिरवा रंग झाडे, पाने आणि निसर्गाचे प्रतीक आहे. हा आरोग्य, वाढ आणि चैतन्य दर्शवतो. जगाच्या पाठीवर नांदणाऱ्या अनेक संस्कृतींमध्ये हा रंग समृद्धी, संपत्ती आणि चांगल्या भाग्याचा संकेत असा ही मानला जातो. हा रंग मनाला शांतता देणारा आणि तणाव दूर करणारा असतो असे ही अनुभवाने म्हणले जाते. ट्रॅफिक सिग्नल किंवा इतर यंत्रणांमध्ये हिरवा रंग पुढे जाण्याची परवानगी किंवा 'यश' दर्शवतो. हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, बुद्धिप्रामण्यवादी, निरपेक्ष प्रेम करणारी असतात दुसऱ्याला आणि स्वतःला क्षमा करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. दुसऱ्याचे मन संभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. सकाळी फिरायला जाण्याचे महत्त्व देखील हिरवा रंग असलेल्या निसर्गाच्या सानिध्याशी अधिक आहे. सकाळी हिरवेगार वृक्ष, वेली पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. विश्रांती मिळते, मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. हिरव्या पालेभाज्या दररोजच्या आहारात नियमित खाण्यात असाव्यात हे तर उत्कृष्ट आरोग्यासाठी आवर्जून सांगितलं जातं.थोडक्यात सांगायचं झालं तर शारदीय नवरात्र उत्सवातील सहाव्या दिवशी विशिष्ट मान मिळालेला हिरवा रंग हा जीवनाचे, चैतन्याचे, सौभाग्याचे तसेच उत्साहाचे प्रतीक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
महाराष्ट्र
- नांदेड: हळदीने गाठला विक्रमी उच्चांक! बाजार समितीत भाव थेट २२ हजार २०० रुपयांवर; वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?



























Subscribe to my channel




